सोमवारी कोलकात्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील गार्फा हाऊस परिसरामधील एक ४० वर्षीय व्यक्ती वडिलांच्या कुजलेल्या मृतदेहासोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कौशिक डे नावाच्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार वडील संगराम यांचं वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. सॉल्ट लेक येथील एका आघाडीच्या अणु संशोधन केंद्रामधील माजी कर्मचारी असणाऱ्या संगराम यांचा तीन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला. कौशिक यांनी आई सुद्धा मागील काही वर्षांपासून याच घरात राहत असून त्यांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्यापासून त्या एकाच जागी असतात.

या प्रकरणामुळे २०१५ साली समोर आलेल्या अशाच एका प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्यात. कोलकात्यामधील रिबिनसन मार्गावरील एका घरामध्ये एक वयस्कर व्यक्ती त्याच्या बहिणीच्या मृतदेहाबरोबरच कुत्र्यांच्या मृतदेहासोबत काही महिने राहत असल्याची माहिती समोर आलेली.

सध्या संगराम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस या अहवालाची वाट पाहत आहे. “आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने त्याच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल शेजाऱ्यांना २ नोव्हेंबर रोजी माहिती दिलेली. नक्की हा मृत्यू कसा झाला यासंदर्भातील खुलासा शवविच्छेदन अहवालातून होईळ त्यामुळे आम्ही त्या अहवालाची वाटत पाहत आहोत. त्यामधूनच मृत्यू कधी, कुठे आणि कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट होईल,” असं पोलीस म्हणाले आहेत.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी संगरामची पत्नीचा जबाब नोंदवलून घेतला आहे. संगरामच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार तिचा मुलगा म्हणजेच कौशिक बेरोजगार आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिने मुलाला मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितलं होतं. मात्र कौशिकने तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तिने केलाय. वडीलांचा सामाजिक जिवनातून मृत्यू झाला असून त्यांचा वास्तवाकडे प्रवास सुरु आहे. ते लवकरच पुन्हा उठून बसतील, असं कौशिक आईला सांगायचा. कौशिकचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची पोलिसांना शंका असल्याने ते आता डॉक्टरांची मदत घेऊन पुढील कारवाई करणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata cops find man staying with dad body at garfa home for 3 months scsg
First published on: 23-11-2021 at 16:15 IST