कोलकाता येथील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या ( Kolkata Crime ) धक्कादायक प्रकरणामुळे तेथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चर्चेत आल आहे. या ठिकाणी काम करणारे माजी अधीक्षक यांनी आता माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. डॉक्टर संदीप घोष हे विविध बेकायदेशीर घटनांमध्ये अडकले होते. असं या माजी अधीक्षकांनी सांगितलं आहे. तसंच बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय हा संदीप घोष यांचा सेक्रेटरी म्हणून काम करायचा असंही त्यांनी म्हटलं आहे. अख्तर अली हे या रुग्णालय आणि महाविद्यालयात अधीक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे.

अख्तर अली यांनी काय सांगितलं?

अख्तर अली हे आर. जी. कर महाविद्यालयात २०२३ पर्यंत कार्यरत होते. त्यांनी अधीक्षक म्हणून काम केलं आहे. त्यांनी माध्यमांना हे सांगितलं की रुग्णालय आणि महाविद्यालयात बेकायदेशीर ( Kolkata Crime ) गोष्टी चालत असत. त्याची कल्पना मी दिली होती, तसंच या प्रकरणी जी समिती डॉ. घोष यांच्याविरोधात लावण्यात आली होती मी त्या चौकशी समितीचा सदस्य होतो. जो तपास आम्ही केला त्यात आम्हाला डॉ. संदीप घोष दोषी आढळले. आमच्या चौकशी समितीने डॉ. घोष यांच्याविरोधात अहवालही सादर केला होता. तसंच त्यामुळे माझी बदलीही करण्यात आली होती. मी ज्या दिवशी अहवाल दिला त्यादिवशी माझी बदली करणण्यात आली.

संदीप घोष २० टक्के कमिशन घ्यायचे

संदीप घोष यांनी महिला डॉक्टरच्या बलात्कार ( Kolkata Crime ) आणि हत्येनंतर पदाचा राजीनामा दिला. मात्र आता त्यांच्याच रुग्णालयात काम करणारे अख्तर अली यांनी सांगितलं की ममता बॅनर्जी सरकारने संदीप घोष यांच्या विरोधात २०२१ पासून चौकशी सुरु केली होती. त्यावेळी संदीप घोष यांच्यावर विद्यार्थ्यांकडून लाच घेतल्याचा आरोप झाला होता. काही विद्यार्थ्यांनी पैसे देऊन त्यांचा निकाल बदलून घेतला होता. तसंच काही विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक नापास करण्यात आलं होतं. अख्तर अली म्हणाले की या प्रकरणात संदीप घोष यांना अटकही झाली होती. एवढंच नाही तर कुठलंही कंत्राट द्यायचं असेल तर घोष २० टक्के कमिशन ( Kolkata Crime ) घेत असत. त्यांचे दोन चांगले मित्र होते एकाचं नाव सुमन हजारा होतं, दुसऱ्याचं नाव बिप्लव सिंघा होतं. या दोघांनाच कंत्राटं मिळायची. त्या बदल्यात संदीप घोष २० टक्के कमिशन घेत असत.

डॉ. संदीप घोष मृतदेहांचा सौदा करत असत

डॉ. संदीप घोष हे बेवारस मृतदेहांचा ( Kolkata Crime ) सौदा करत असत. बांगलादेशात बायोमेडिकल वेस्ट विकण्याण्यासाठी ते या गोष्टीचा वापर करत त्यातून त्यांना चांगली कमाई होत असे. संदीप घोष यांनी याच महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. नंतर ते या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. त्यांनी २००० च्या आसपास या रुग्णालय आणि महाविद्यालयात काम करण्यास सुरुवात केली. संदीप घोष यांच्यामागे राजकीय वरदहस्त होता त्यामुळेच त्यांना अटक झाली तरीही त्यांची सुटका झाली आणि त्यांच्या विरोधात फारशा कारवाया झाल्या नाहीत. इंडिया टुडेने हे वृत्त दिलंआहे.