Kolkata Doctor Case : कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासह अजून काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, या चौकशीमधून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आता माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासह चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या पॉलीग्राफ चाचणी करण्यात येणार असल्याचं एनडीटीव्हीने एका वृत्तात म्हटलं आहे.

कोलकाता प्रकरणामध्ये सीबीआयकडून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासह चार डॉक्टरांच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. सीबीआयने या प्रकरणामध्ये माजी प्राचार्य संदीप घोष आणि इतर चार डॉक्टर अधिकाऱ्यांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. यानंतर आज विशेष न्यायालयाकडून या पॉलीग्राफ चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे.

हेही वाचा : Kolkata Rape and Murder : ‘कोलकाता पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला होता ?’ सीबीआयने काय दिलं उत्तर?

दरम्यान, आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येची घटना घडली. त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या चार डॉक्टरांची पॉलीग्राफ चाचणी करण्यात येणार आहे. सीबीआय गेल्या आठवडाभरापासून माजी प्राचार्याची रोज चौकशी करत आहे. पण समाधानकारक प्रतिसाद उत्तर न मिळाल्याचं सीबीआयचं म्हणण आहे.

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी संजय रॉय याची देखील पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. मात्र, ही घटना घडली त्या घटनेच्या रात्री त्या महिला डॉक्टरबरोबर जेवण केलं होतं. मात्र, त्या डॉक्टरांकडून योग्य ते उत्तर मिळत नाही किंवा काही माहिती लपवली जात असल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे आता माजी प्राचार्य संदीप घोष आणि इतर चार डॉक्टरांचीही पॉलीग्राफ चाचणी करण्यात येणार आहे.

कोलकातामधील घटनेचा तीव्र निषेध

कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी कोलकात्याच्या सरकारी आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालयात घडली होती.