Kolkata Doctor Murder Case Nirbhaya’s Mother angry on Mamata Banerjee : कोलकात्यामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी देशभरातील डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, दिल्ली बलात्कार प्रकरणातील पीडिता निर्भयाची आई देखील कोलकात्यामधील पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावली आहे. निर्भयाची आई आशा देवी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हटलं आहे की “त्या स्थिती सांभाळण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचं पद सोडलं पाहिजे”.

आशा देवी यांनी पीटीआयशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे असलेली क्षमता वापरून स्थित सांभाळण्याऐवजी त्या स्वतः आंदोलन व निषेध करत आहेत. याद्वारे त्या केवळ लोकांचं लक्ष विचलित करण्याचा, मुख्य मुद्द्यावरून लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या स्वतः महिला असूनही हे प्रकरण गांभीर्याने हाताळताना दिसत नाहीत. त्यांनी राज्याच्या प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडायला हवी होती, दोषींवर कठोर कारवाई करायला हवी होती. मात्र त्या या कामात अपयशी ठरल्या आहेत. राज्यातील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.”

karnataka cm siddaramaiah
‘मुदा’ घोटाळाप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; तक्रारदाराचा आरोप, ईडीकडे कारवाईची मागणी
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
FIR Against Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक रोखेसंदर्भात गुन्हा दाखल!
Property Rights Of Illegitimate Children in India
अवैध विवाहाच्या अपत्यांचा वारसाहक्क
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

हे ही वाचा >> Kolkata Doctor Murder : पीडितेवर सामूहिक बलात्कार? पोलिसांकडून नातेवाईकांवर दबाव? सर्व आरोपांवर आयुक्तांचं स्पष्टीकरण

निर्भयाची आई आशा देवी काय म्हणाल्या?

२०१२ मध्ये दिल्लीत एका तरुणीवर (निर्भया – बदलेलं नाव) बलात्कार झाल्यानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील लोक रस्त्यावर उतरले होते. निर्भयाच्या आईसह संपूर्ण कुटुंबाने तब्बल आठ वर्षे न्यायालयीन लढा देऊन २० मार्च २०२० रोजी निर्भयाला न्याय मिळवून दिला व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली. कोलकात्यातील बलात्काराच्या घटनेने लोकांना निर्भया प्रकरणाची आठवण झाली आहे. दरम्यान, निर्भयाच्या आईने, कोलकाता बलात्कार व खून प्रकरणावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “देशातील परिस्थिती अजूनही तशीच आहे. कोलकात्यात डॉक्टर तरुणीबरोबर जे काही घडलं, आतापर्यंत जो काही तपास केला गेला आहे ते पाहून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे बलात्कार व खून प्रकरण, त्याबाबत पोलिसांनी केलेला तपास, आतापर्यंत झालेली कारवाई पाहता असं वाटतंय की आपण अजूनही २०१२ मध्येच आहोत. देशातील परिस्थिती तीळमात्र बदलेली नाही”.