Kolkata Doctor Rape Case : उत्तर कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. घटनेच्या पाच दिवसांनंतरही कोलकाता पोलिसांना तपासामध्ये लक्षणीय प्रगती करता आलेली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, लगेचच खुनाचा गुन्हा का नोंदवला नाही अशी विचारणाही राज्य सरकारकडे केली. आता यावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. "कोलकातामध्ये ज्युनिअर डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. तिच्या मृत्यूप्रकरण आणि अमानवीय कृत्याबाबत ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्यामुळे डॉक्टर समूदाय आणि महिलांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे", असं राहुल गांधी म्हणाले. "पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय आणि स्थानिक प्रशासन करत आहे. मेडिकल कॉलेजसारख्या ठिकाणी डॉक्टर्स सुरक्षित नाहीत, तर कोणत्या विश्वासाने पालक आपल्या मुलींना येथे शिकायला पाठवतात? निर्भया प्रकरणानंतर अनेक कठोर कायदे तयार झाले, तरीही गुन्हेगारांना रोखण्यात अपयश का येत आहे?" असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. हेही वाचा >> Kolkata Doctor Murder : कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार? शवविच्छेदन अहवालानंतर डॉक्टरांचं खळबळजनक वक्तव्य "हाथरस येथील उन्नाव प्रकरण, कठुआ प्रकरण आणि आता कोलकाता येथील प्रकरणांमुळे महिलांविरोधात घडणाऱ्या घटनांमुळे प्रत्येक वर्गाने आणि पक्षाने एकत्रित येऊन विचार-विमर्श करून ठोस उपाय शोधायला हवा", असं आवाहनही राहुल गांधी यांनी केलं. "अशा कठीण प्रसंगात मी पीडितेच्या कुटुंबाबरोबर आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळो आणि दोषींना कोठरातील कठोर शिक्षा मिळायला पाहिजे. जेणेकरून समाजात एक उदाहरण तयार होईल", असं राहुल गांधी म्हणाले. कोलकाता में जूनियर डॉक्टर के साथ हुई रेप और मर्डर की वीभत्स घटना से पूरा देश स्तब्ध है। उसके साथ हुए क्रूर और अमानवीय कृत्य की परत दर परत जिस तरह खुल कर सामने आ रही है, उससे डॉक्टर्स कम्युनिटी और महिलाओं के बीच असुरक्षा का माहौल है।पीड़िता को न्याय दिलाने की जगह आरोपियों को…— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 14, 2024 कोलकाता येथील पीडितेवर सामूहिक बलात्कार? कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर काही पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. दरम्यान, आता एका डॉक्टरने दावा केला आहे की या बलात्कार व हत्या प्रकरणात एकापेक्षा जास्त आरोपी सहभागी आहेत. अखिल भारतीय शासकीय डॉक्टर संघाचे सरचिटणीस डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी दावा केला आहे की त्यांनी या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल वाचला आहे. या शवविच्छेदन अहवालात तरुणीच्या गुप्तांगात १५१ मिलीग्रॅम वीर्य आढळल्याचं नमूद करण्यात आलं आहे, असं गोस्वामी म्हणाले. तसेच ही माहिती सांगत गोस्वामी यांनी तरुणीवर एकापेक्षा जास्त जणांनी बलात्कार (सामूहिक बलात्कार) झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे.