तो शॉर्ट्स घालून बँकेत गेला आणि….; स्टेट बँकेच्या ग्राहकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

त्याने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटिझन्सने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे स्टेट बँकेची. कारणही तसंच काहीसं आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियावर आपला स्टेट बँकेतला एक अनुभव शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टमुळे आता नेटिझन्सनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली आहे. आशिष नावाच्या एका व्यक्तीने आपल्या कपड्यांमुळे त्याला बँकेत जाण्यापासून रोखल्याची माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटर पोस्टमध्ये आशिष म्हणतो की, बँकेत जात असताना त्याने शॉर्ट्स परिधान केली होती. मात्र, बँकेच्या स्टाफने त्याला पूर्ण पँट घालून येण्यास सांगितलं. बँकेच्या वातावरणाचं भान राखून कपडे घालण्याचं आवाहनही त्याला बँकेनं केलं. तो आपल्या पोस्टमध्ये स्टेट बँकला टॅग करुन म्हणतो, आज तुमच्या एका शाखेत शॉर्ट्स घालून गेलो होतो, मला सांगण्यात आले की मला पूर्ण पँट घालून परत यावे लागेल कारण शाखेची अपेक्षा आहे की ग्राहकांनी शालीनता राखावी.

आशिषच्या या पोस्टनंतर स्टेट बँकेनेही त्याला उत्तर दिलं आहे. बँकेने म्हटलं आहे की बँकेची अशी ड्रेसबद्दलची कोणतीही पॉलिसी नाही. ज्याला जसा आवडेल तसा पेहराव करुन ग्राहक बँकेत येऊ शकतात. आशिष कोणत्या बँकेत गेले होते, त्या शाखेचं नाव आणि कोड आम्हाला कळवावा. आम्ही या प्रकरणात लक्ष घालू.

त्याच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सनी बँकेच्या या कृतीला आपलं समर्थन दर्शवलं आहे. बँकेत जाताना आपण कोणते कपडे घालतो याचं भान राखणं गरजेचं आहे, तुम्ही तिथे फॉर्मल कपडे घालूनच गेलं पाहिजे असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी आशिषला बँक बदलण्याचा सल्ला देत बँकेच्या धोरणावर टीका केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kolkata man denied entry in sbi branch for wearing shorts viral post divides internet vsk

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या