Sanjoy Roy : कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेतला आरोपी संजय रॉय ( Sanjoy Roy ) याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र याच संजय रॉयबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

नेमकी ही घटना काय घडली?

कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. या घटनेतले नवे पैलू रोज समोर येत आहेत. आता आरोपी संजय रॉयबाबत तो या डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी आणि तिची हत्या करण्याआधी तो रेड लाइट एरियात गेला होता अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता संजय रॉयबाबत ( Sanjoy Roy ) ही माहिती दिली आहे.

AI technology will be use in Bopdev Ghat gang rape case
बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणातील तपासात एआयचा वापर
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
korpana city youth congress marathi news
बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अकोल्यात ठोकल्या बेड्या
walchand college of engineering
वालचंद महाविद्यालय बळकाविण्यासाठी अडवणुकीचे सत्र
Sandip Ghosh
Sandip Ghosh R G Kar Hospital : “आरोप सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते”, संदीप घोष यांचा जामीन फेटाळताना न्यायालयाने नोंदवलं महत्वाचं निरीक्षण
mva protest in front of police commissionerate for action on trustee over girl molestation case
महाविद्यालयाच्या आवारात अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी – MVA कडून आयुक्तालयासमोर आंदोलन
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?
cbi arrests rg kar ex principal and psi
कोलकाता बलात्कार प्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह पोलीस निरीक्षकाला अटक; पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप

हे पण वाचा- Kolkata and Badlapur Case : कोलकाता आणि बदलापूर प्रकरणात फरक काय? गुन्हेगाराला शिक्षा मिळाली तरी गुन्हे थांबतील?

संजय रॉयबाबत नवी माहिती समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय रॉय ( Sanjoy Roy ) आणि त्याचा एक सहकारी सोनागाछी या ठिकाणी गेले होते. ८ ऑगस्टच्या रात्री हे दोघंही सोनागाछी या ठिकाणी गेले होते. सोनागाछी हा कोलकाता येथील रेडलाईट एरिया आहे. यावेळी संजय रॉय प्रचंड प्रमाणात दारु प्यायला होता. संजय रॉय बरोबर आलेला सहकारी वेश्येकडे गेला. संजय त्यावेळी बाहेर उभा होता. त्यानंतर पहाटे २ वाजण्याच्या सुमारास हे दोघंही दुसऱ्या एका वेश्यावस्तीकडे गेले. यावेळी आरोपी संजय रॉयने एका महिलेची छेड काढली आणि तिला नग्न फोटो देणार का? अशी विचारणा केली. संजय रॉयच्या पार्टनरने एक कमर्शियल बाईक भाडे तत्त्वावर आणली होती. त्यानंतर संजय रॉय हा आर. जी. कर रुग्णालयात परतला. यानंतर त्याने सेमिनार हॉलमध्ये आराम करत असलेल्या डॉक्टरवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली.

संजयने गुन्ह्याची दिली कबुली

पोलिसांच्या चौकशीत संजय रॉयने गुन्हा मान्य केला आहे. ट्रेनी डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये झोपली होती तेव्हा तिच्यावर बलात्कार केल्याचं संजय रॉयने मान्य केलं. संजय रॉय हा त्या दिवशी रात्री दोन ते तीनवेळा हॉस्पिटलमध्ये आला होता. एकदा त्याने ऑपरेशन थिएटरचं दारही तोडलं अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.