Kolkata Rape and Murder Case : कोलकाता या ठिकाणी असलेल्या आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी ९ ऑगस्टला एका ट्रेनी महिला डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. या महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. अत्यंत क्रूर आणि भयंकर पद्धतीने या डॉक्टर तरुणीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली. आता आपण निर्दोष आणि निष्पाप असल्याचा दावा संजय रॉयने न्यायाधीशांपुढे केला आहे.

११ तारखेपासून खटला सुरु होणार

पश्चिम बंगालच्या सेलदाह न्यायालयात आरोपी संजय रॉयला आणण्यात आलं होतं. त्याच्यावर कलम १०३ (१), कलम ६४ आणि ६६ या अन्वये ट्रायल सुरु होणार आहे. हा खटला ११ नोव्हेंबरपासून सुरु होईल. संजय रॉयने मात्र मला या सगळ्या प्रकरणात अडकवलं जात असल्याचं म्हटलं आहे.

D. Y. Chandrachud in Express Adda
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड एक्स्प्रेस अड्डावर! कार्यक्रम पाहा लाइव्ह
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
IAS Whatsapp Group Controversy
IAS Whatsapp Group Controversy : IAS अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून मोठा गोंधळ; केरळ सरकार करणार चौकशी, तर फोन हॅक झाल्याचा अधिकाऱ्याचा दावा
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…

काय म्हटलं आहे संजय रॉयने?

“मला अडकवलं जातं आहे. मी न्यायाधीशांना सांगितलं की मी निष्पाप आहे. मात्र त्यांनी माझं काहीही ऐकून घेतलं नाही. ” असं आरोपी संजय रॉयने सांगितलं.

सीबीआयने चार्जशीट केलं दाखल

कोलकाता आर.जी. कर. महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात ( Kolkata Rape and Murder ) सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. याच प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाचं नाव अभिजित मंडल आहे तर दुसऱ्या आऱोपीचं नाव आर. जी. कर महाविद्यालायचा माजी प्राचार्य संदीप घोष असं आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप या दोघांवर आहे. या प्रकरणात आरोपनिश्चिती करण्यासाठी न्यायालयाने ४ नोव्हेंबर ही तारीख दिली होती. या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा करण्यात येईल. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!

सीबीआयने आरोपपत्रात काय म्हटलं आहे?

आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालय महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने ७ ऑक्टोबरला आरोपपत्र दाखल केलं. त्यात संजय रॉयने गुन्हा कसा केला ते ११ मुद्दे मांडत स्पष्ट केलं आहे. पुरावे, कबुली जबाब, कागदपत्रं, फॉरेन्सिकचे अहवाल आणि इतर पुराव्यांचा यात समावेश आहे. संजय रॉय याची जीन्स सापडली आहे. त्यावर पीडितेच्या रक्ताचे डाग आहेत. संजय रॉयच्या अंगावर ज्या जखमा झाल्या आहेत त्या पीडितेने केलेल्या प्रतिकारामुळे आहेत. तसंच घटनास्थळी संजय रॉयचा ब्लू टूथ हेडफोनही सापडला होता.

९ ऑगस्टला काय घटना घडली?

Kolkata Rape and Murder कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयात ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करणारी एक डॉक्टर ८ ऑगस्टच्या रात्री उशिरा तिची शिफ्ट संपल्यानंतर आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये आराम करण्यासाठी गेली होती. ९ ऑगस्टला सकाळी तिचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा कळलं की या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तिच्या शरीरावर २५ जखमा होत्या. संजय रॉयनेच या डॉक्टरवर आधी बलात्कार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) केली. तिच्या मृतदेहाची विटंबना केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये गेला होता आणि नंतर पहाटे ४.३० च्या सुमारास बाहेर आला हे स्पष्ट दिसतं आहे.

Story img Loader