Kolkata Rape and Murder : कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या कऱण्यात आली. या प्रकरणात आरोप संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर सुरु झालेली आंदोलनं अद्याप सुरुच आहेत. आता या पीडितेच्या हत्येपूर्वीच काय घडलं? तिचे शेवटचे तास कसे होते हे तिच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे.
९ ऑगस्टला काय घटना घडली?
९ ऑगस्टला कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयाच्या सेमीनार हॉलमध्ये डॉक्टर महिलेचा मृतदेह ( Kolkata Rape and Murder ) छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. हा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. पहाटे साधारण अडीच ते साडेपाच या कालावधीत संजय रॉय याने या ठिकाणी येऊन महिला डॉक्टरवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. या प्रकरणानंतर सुरु झालेली आंदोलनं अजूनही सुरु आहेत. आता या महिला डॉक्टरच्या मृत्यूपूर्वीचे ( Kolkata Rape and Murder ) काही तास कसे होते ते तिच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे.
हे पण वाचा- “न्याय हिसकावून घ्यावा लागेल”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया
पीडितेच्या सहकाऱ्यांनी काय सांगितलंं?
कोलकाता पीडितेवर बलात्कार आणि हत्येआधी ( Kolkata Rape and Murder ) नेमकं काय घडलं ते आता तिच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. सकाळी १० वाजता पीडिता आर.जी. कर रुग्णालयात आली होती. त्यानंतर या महिला डॉक्टरने युनिट २ कडे लक्ष दिलं. त्या ठिकाणी सहा रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेतलं. त्यानंतर ती जेवायला गेली. दुपारी ३ वाजण्याच्या आसपास ती जेवायला गेली. त्यानंतर ती आली आणि तिचं काम करु लागली. असं महिला डॉक्टरच्या एका सहकारी डॉक्टरने सांगितलं. त्यानंतर दुपारी ४.३० च्या सुमारास मी हॉस्पिटल सोडलं, तिला सांगितलं की काही काम असेल तर फोन कर. पण दुसऱ्या दिवशी तिची हत्या झाल्याचीच बातमी आली.
ज्युनिअर डॉक्टरने काय सांगितलं?
महिला डॉक्टरच्या ज्युनिअरने सांगितलं की आम्ही त्या दिवशी हॉस्पिटलच्या वऱ्हंड्यात भेटलो होतो. दीदी खूप डॅशिंग होती. कुठल्याही प्रसंगाला धैर्याने सामोरी जायची. त्या दिवशी मध्यरात्री २ वाजेपर्यंत ती वॉर्डमध्ये होती. तिच्या वॉर्डमध्ये असलेली सगळी जबाबदारी तिने घेतली होती. १६ तास काम केल्यानंतर ती आराम करायला सेमीनार हॉलमध्ये गेली होती ज्यानंतर ही घटना घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मृत्यूची बातमी समोर आली असं त्याने सांगितलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तो रुग्णालयात आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये ेदिसतं आहे. तसंच पोलिसांना सेमीनार हॉलमध्ये संजय रॉयचा हेडफोनही सापडला. आता या प्रकरणी सीबीआय पुढील तपास करते आहे.