Kolkata Rape and Murder : कोलकाता या ठिकाणी ९ ऑगस्टला झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या ( Kolkata Rape and Murder ) घटनेने सगळा देश हादरला. यानंतर पीडितेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आलं. आता याच कोलकाता या ठिकाणी असलेल्या सोनागाछी या ठिकाणी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांनीही महत्त्वाचं आवाहन केलं आहे. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. त्याची लाय डिटेक्टर टेस्ट आणि पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली.

Kolkata Rape and Murder Case
कोलकातामधील घटनेत माजी प्राचार्यासह चार डॉक्टरांची होणार पॉलिग्राफ चाचणी, (फोटो-संग्रहित छायायाचित्र)

नेमकी घटना काय घडली?

९ ऑगस्टला सकाळी एक महिला डॉक्टर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या ( R.G. Kar Hospital ) सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा ( Kolkata Rape and Murder ) होत्या. तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होतं अशीही माहिती समोर आली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुलीला न्याय दिला पाहिजे अशी मागणी होते आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. त्याआधी तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर सोनागाछी येथील देहविक्री करणाऱ्या महिलांनी एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

thane education officer challenges suspension over badladpur sex assault in bombay hc
Badlapur Sexual Assault: निलंबनाच्या कारवाईविरोधात ठाण्याचे शिक्षणाधिकारी उच्च न्यायालयात
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Swati Maliwal attacks Atishi brings Afzal Guru angle
Swati Maliwal attacks Atishi: ‘आतिशीच्या कुटुंबाने अफझल गुरूची फाशी रोखण्याची विनंती केली’, स्वाती मालिवाल यांचे टीकास्र
Sanjeev Kumar And Sachin Pilgaonkar
“माझा दारू प्यायलेला…”, सचिन पिळगांवकरांनी सांगितली संजीव कुमार यांच्याबरोबर कशी झाली होती मैत्री; म्हणाले, “ते घरी…”
us elections indians vote bank in america
अमेरिकेत भारतीयांची ‘व्होट बँक’ आहे?
why saif ali khan grandfather built Pataudi Palace
८०० कोटींचा पतौडी पॅलेस रंगवण्याऐवजी सैफ अली खानने लावला चुना; सोहा अली खान म्हणाली, “आजोबांचे पैसे…”
donald trump kamala harris presidential debate
अग्रलेख : वीज म्हणाली…
loksatta editorial on ajit ranade marathi news,
अग्रलेख : ‘माहेर’चे मस्तवाल!

हे पण वाचा- Sanjoy Roy : “संजय रॉय आधी रेड लाईट एरियात गेला आणि…”, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीबाबत माहिती समोर

सोनागाछीतल्या देहविक्री करणाऱ्या महिलांचं आंदोलन

सोनागाछी हा कोलकाता येथील रेड लाईट एरिया आहे. या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या महिलांनी कोलकाता बलात्कार आणि हत्याकांडाचा निषेध केला आहे. त्या महिलांनी या घटनेविरोधात निदर्शनं केली आणि त्यांना या घटनेबाबत काय वाटतं ते माध्यमांना सांगितलं.

काय म्हटलं आहे सोनागाछीतल्या महिलांनी?

देहविक्री करणारी महिला म्हणाली, “तुमच्या शरीराची भूक इतकी उफाळून आली असेल तर खुशाल सोनागाछीला या, तुमची भूक भागवा. पण कृपा करुन कुठल्याही मुलीचं किंवा महिलेचं शोषण करु नका तसंच कुणावरही बलात्कार करु नका.” देहविक्री करणाऱ्या इतर महिलांनीही अशाच प्रकारे मतप्रदर्शन केलं आहे. द वीकने हे वृत्त दिलं आहे.

९ ऑगस्टच्या दिवशी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आर. जी. कर रुग्णालयात आढळला होता. या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या पीडितेच्या शवविच्छेदनानंतर तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली.