Kolkata Rape Case : कोलकात्यातली प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या तपासादरम्यान महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताच्या गळ्यात ब्लुटूश इअरफोन आहे. आरजी कर मेडीकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये महिलेचा मृतदेह आढळळ्यानंतर प्राथमिक तपासादरम्यान गुन्ह्याच्या ठिकाणी पोलिसांना ब्लुटूथ इअरफोन सापडला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय मध्यरात्री १.०३ मिनिटांनी रुग्णालयात दाखल होताना दिसतोय, अशी माहिती सूत्रांनी दिली. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याला सीसीटीव्हीचे पुरावे दाखवले होते, त्यानंतर संजय रॉयने गुन्हा कबूल केल्याचंही सूत्रांनी म्हटलं असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

mira road police suicide
मीरा रोड मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Passengers upset, Kasara local time, Karjat local time,
शेवटच्या कसारा, कर्जत लोकलच्या वेळा बदलल्याने प्रवासी नाराज
gangster Tamil Nadu arrested, gangster Tamil Nadu in Mumbai,
तामिळनाडूमधील कुख्यात गुंडाला मुंबईत अटक; हत्या, हत्येच्या प्रयत्नासारखे अनेक गुन्हे दाखल
korpana city youth congress marathi news
बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अकोल्यात ठोकल्या बेड्या
Encroachment of vendors on footpaths of Rana Pratap Nagar nagpur
नागपूर:राणा प्रतापनगरचे पदपथ विक्रेत्यांच्या ताब्यात
कल्याणीनगर भागात १९ मे रोजी झालेल्या अपघातात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला दिल्लीतील शिक्षण संस्थेने प्रवेश नाकारला 
Kalyaninagar accident case Report by Police to Juvenile Justice Board against minor Pune news
अल्पवयीनाविरुद्ध बाल न्याय मंडळात पोलिसांकडून अहवाल; कल्याणीनगर अपघात प्रकरण

दरम्यान, प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या झाली, त्या रात्री आरोपी रुग्णालयात जाण्यापूर्वी वैश्यावस्तीत गेला होता. तिथे तो दारू प्यायला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर तो मध्यरात्री रुग्णालयात गेला असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टर आराम करत होती. या घटनेचा निषेध देशभर व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर देशभर विविध ठिकाणी अशाच पद्धतीच्या घटना घडल्याने देशभरातली नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर, कोलकाता येथील विशेष न्यायालयाने संजय रॉयची पॉलिग्राफ चाचणी करण्यास सीबीआयला परवानगी दिली आहे.

हेही वाचा >> Kolkata Rape Case : “मी त्याला भेटले तर विचारेन की…”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या आईची प्रतिक्रिया

पीडितेची ओळख जाहीर केल्यास कारवाई

आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील ज्या डॉक्टरची बलात्कार करुन हत्या ( Kolkata Crime ) करण्यात आली त्या डॉक्टराचा फोटो सोशल मीडियावर शेअर होतो आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप नोंदवला आहे. अनेक युजर्स या मुलीच्या नावासह तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत ही बाद क्लेशदायक आहे. घटना घडल्यानंतर पुढच्या ४८ तासांमध्ये या महिला डॉक्टरचा फोटो व्हायरल झाला. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

कोलकाता येथील आर. जी. कर आरोग्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरोधात पीडित महिला डॉक्टरची ( Kolkata Crime ) ओळख जाहीर केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ वर्षीय ट्रेनी डॉक्टरवर ९ तारखेच्या रात्री बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोन महिला डॉक्टरांनी अफवा पसरवण्याचं काम केलं असाही आरोप भाजपाच्या आमदार लॉकेट चटर्जींनी केला आहे.