Kolkata Rape Case Ward Boy arrested : कोलकाता येथील आर. जी. कर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचं प्रकरण ताजं असतानाच याच शहरात आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. कोलकात्यातील दुसऱ्या एका रुग्णालयात महिलेची छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की पीडित महिलेच्या मुलावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. रात्री आई तिच्या मुलाच्या शेजारी झोपली होती. त्याचवेळी रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने झोपेत असलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की आरोपी वॉर्डबॉयने आधी त्या महिलेचा झोपलेल्या अवस्थेत व्हिडीओ चित्रीत केला. त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीनंतर वॉर्डबॉयला अटक केली आहे.

anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : ‘एक तर तू राहशील किंवा मी राहिन’, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “त्यांना वाटत असेल तर..”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

वॉर्डबॉयकडून महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

इंडिया टूडेच्या वृत्तानुसार पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की पीडितेचा मुलगा या रुग्णालयात उपचार घेत आहे. शनिवारी रात्री रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील वॉर्डमध्ये आई तिच्या मुलाशेजारीच झोपली होती. त्याचवेळी वॉर्ड बॉयने तिला स्पर्श केला, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना आरोपी एका हातात फोन घेऊन व्हिडीओ शूट करत होता.

हे ही वाचा >> Gym Owner Murder : दिल्लीतल्या जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या, लॉरेन्स बिश्नोई गँगचं ‘हे’ कनेक्शन समोर

महिलेने रविवारी सकाळी कडया पोलीस ठाणं गाठलं आणि तिथे जाऊन तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी २६ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपी हा मूळचा त्रिपुराचा रहिवासी असून सध्या दक्षिण परगना जिल्ह्यातील सुभाषग्राममध्ये वास्तव्यास आहे.

हे ही वाचा >> “झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”

भाजपाची ममता बॅनर्जी सरकारवर टीका

बंगाल भाजपाचे केंद्रीय सहप्रभारी अमित मालवीय यांनी या घटनेवरून राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका केली आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पश्चिम बंगालमधील शासकीय रुग्णालयांमध्ये महिला असुरक्षित आहेत. आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाने राज्य हादरलं आहे. आता कोलकाता इन्स्टिट्युट ऑफ चाइल्ड हेल्थ रुग्णालयात एका २६ वर्षीय महिलेचा विनयभंग झाला आहे.