युद्ध संपण्याच्या काही महिने आधी, एप्रिल १९९९मध्ये इतर २२ विचारवंतांबरोबर एक प्रख्यात शल्यचिकित्सक अडेम अडेमी हेही बेपत्ता झाले होते. जवळपास ३० वर्षांनंतर, आपल्या वडिलांचे अवशेष सापडतील, अशी आशा अडेमी यांचा मुलगा एर्बलिन अडेमी यांना वाटत आहे. एर्बलिन यांनी वयाच्या नवव्या वर्षी आपल्या पित्याला शेवटचे पाहिले होते.

उत्तरेकडील झुबिन पोटोक नगरपालिकेतील कालुडर ई व्होगेल गावाजवळ मानवी अवशेष सापडल्यानंतर जुलैच्या अखेरीस उत्खनन सुरू झाले. कोसोव्होचे पंतप्रधान अल्बिन कुर्ती यांनी सांगितले की, सर्बियन सैनिकांच्या तावडीतून वाचण्यासाठी कोसोव्होमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पकडले गेलेले हे बेपत्ता विचारवंतच हे बळी असू शकतात, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

‘ह्युमॅनिटेरियन लॉ सेंटर’ या मानवाधिकार गटाच्या म्हणण्यानुसार, कोसोव्होच्या बेपत्ता लोकांमध्ये सुमारे १,२०० वांशिक अल्बेनियन, सुमारे ४०० वांशिक सर्ब आणि डझनभर रोमा समुदायाच्या लोकांचा समावेश आहे. युद्धात १३,००० लोकांचा मृत्यू कोसोव्होच्या युद्धात सुमारे १३,००० लोकांचा मृत्यू झाला. या युद्धात वांशिक अल्बेनियन लोकांनी सर्बियापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बंड पुकारले होते. कोसोव्होने २००८ मध्ये सर्बियापासून स्वतःला स्वतंत्र घोषित केले, ज्याला बेलग्रेडने (सर्बियाची राजधानी) अद्याप मान्यता दिलेली नाही.

करारात अडथळे आणल्याचा आरोप मे २०२३मध्ये, सर्बिया आणि कोसोव्होमध्ये एक करार झाला, ज्यामध्ये बेपत्ता लोकांच्या स्थितीबद्दल स्पष्टता आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मकता दर्शविली होती. परंतु कोसोव्हो आणि सर्बियाने एकमेकांवर एकत्र काम करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणल्याचा आरोप केला आहे.कोट जेव्हा जेव्हा आम्ही उत्खनन सुरू झाल्याचे ऐकतो, तेव्हा नेहमी संमिश्र भावना असते, आशेची आणि त्याचवेळी वेदनेची भावना असते.-एर्बलिन अडेमी, बेपत्ता अडेम अडेमी यांचा मुलगा