कुलभूषण जाधव हे भारताचे सुपूत्र असून त्यांना फाशी दिल्यास पाकिस्तानने परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे असा इशाराच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिला आहे. कुलभूषण हे निर्देोष असून त्यांच्या सुटकेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलभूषण जाधवप्रकरणावर मंगळवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभा आणि लोकसभेत निवेदन दिले. सुषमा स्वराज म्हणाल्या, कुलभूषण जाधव यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याने आढळलेले नाही. त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. त्यांना फाशीची शिक्षा देणे म्हणजे पूर्वनियोजित हत्याच ठरेल असे स्वराज यांनी सुनावले. कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याच्या दिशेने पाकिस्तानने पाऊल टाकले तर पाकिस्तानने परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे. दोन्ही देशांमधील संबंधावर याचे परिणाम होतील असे त्यांनी सांगितले. जाधव यांच्या रक्षणासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करणार. ते देशाचे सुपूत्र आहेत असे त्यांनी नमूद केले. भारताच्या या सुपूत्राला वाचवण्यासाठी वकील उभा करणे ही छोटी गोष्ट आहे. आम्ही थेट राष्ट्रपतींपर्यंत हा मुद्दा उपस्थित करु असे त्या म्हणाल्यात. कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर पाकिस्तानमधील एका नेत्यानेच प्रश्न उपस्थित केल्याचे सुषमा स्वराज यांनी निदर्शनास आणून दिले. कुलभूषण जाधव यांच्याविरोधात कट रचण्यात आला असा आरोपही त्यांनी केला.

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मंगळवारी संसदेतही कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. लोकसभेत काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी जाधवप्रकरणावरुन केंद्र सरकारला जाब विचारला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावतात. मग ते अशा प्रकरणात थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा करु शकत नाही का? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kulbhushan jadhav death sentence external affairs minister sushma swaraj india warns pakistan rajya sabha
First published on: 11-04-2017 at 13:08 IST