उत्तरखंडमधील हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये करोना चाचण्यांसंदर्भात झालेल्या घोटाळ्यातील नवीन नवीन माहिती रोज समोर येत आहे. कुंभमेळ्यासंदर्भात आरोग्य विभागाने ज्या मॅक्स कॉर्परेट नावाच्या कंपनीला एक लाख करोना चाचण्यांचं कंत्राट दिलं होतं ती कंपनीच अस्तित्वात नसल्याची माहिती समोर आली आहे. न्यूज १८ ने केलेल्या पडताळणीमध्ये एक लाख करोना चाचण्यांचं कंत्राट देण्यात आलेली मॅक्स कॉर्परेट कंपनी केवळ कागदावर म्हणजेच ऑन पेपर असल्याचा खुलासा झालाय. एका बनावट कंपनीला कुंभमेळ्यामधील करोना चाचण्यांचं कंत्राट देण्यात आल्याचं उघड झाल्याने कुंभमेळा आयोजनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

नक्की वाचा >> एका LIC एजंटमुळे समोर आला एक लाख बनावट चाचण्यांचा घोळ

illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

त्या दोन प्रयोगशाळांसोबत थर्ड पार्टी करार झाला

समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीची नोंदणी ज्या पत्त्यावर झालीय त्या ठिकाणी कोणताही कंपनी अस्तित्वात नाहीय. या प्रकरणामध्ये प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तपास समितीची स्थापना केलीय. तर दुसरीकडे कुंभमेळ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही आपल्या बाजूने एका समितीची स्थापना करुन तपास सुरु केलाय. कुंभमेळ्यातील आरोग्य अधिकारी डॉ. अर्जुन सिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने सर्व खासगी प्रयोगशाळांसोबत करार केला होता. मात्र दिल्लीमधील लाल चंदानी लॅब आणि हिस्सारमधील नालवा प्रयोगशाळेसोबत थर्ड पार्टी करारानुसार कंत्राट देण्यात आलं होतं.

१० दिवसांमध्ये अहवाल

हरिद्वारचे जिल्हाधिकारी सी. रविशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासादरम्यान खासगी प्रयोगशाळांच्या काराभारामध्ये अनेक ठिकाणी नियोजनामधील गोंधळ दिसून आला. यामध्ये दुसऱ्या शहरांमधील नावांचा वापर करणे, एका ओळखपत्रावर अनेकदा चाचण्या झाल्याचं दाखवणं आणि एकाच प्रयोगशाळेत मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात येणं यासारख्या प्रकरणाचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून १० दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाणार आहे. गोंधळ असल्याचं सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

असं समोर आलं प्रकरण… 

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या कुंभमेळ्यासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. करोना कालावधीमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होणाऱ्या या कुंभमेळ्याच्या आयोजनाला परवानगी दिल्याने आधीच वाद झालेला असतानाच आता या कुंभमेळ्यामधील करोना चाचाण्यांसंदर्भातील माहिती समोर येत आहे. उच्च न्यायालयापासून अनेक सरकारी संस्थांनी या कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भातील सूचना केलेल्या. मात्र तरीही या कुंभमेळ्यामध्ये करोना चाचणी घोटाळा झाल्याची माहिती समोर आलीय. आश्चर्याची बाब म्हणजे हा घोटाळा पंजाबमधील फरीदकोट येथे राहणाऱ्या एका एलआयसी एजंटमुळे समोर आला. विपन मित्तल असं या एलआयसी एजंटचं नाव आहे.

एक मेसेज आला अन्…

मित्तल यांना २२ एप्रिल रोजी एक मेसेज आला होता. त्यामध्ये त्यांच्या करोना चाचणीचा निकाल निगेटीव्ह असल्याचं त्यांना कळवण्यात आलं. मात्र मित्तल यांनी करोना चाचणी केलेली नसतानाही त्यांना हा मेसेज आल्याने ते गोंधळले. आपली खासगी माहिती चोरीला जात असल्याची शंका आल्याने त्यांनी यासंदर्भातील चौकशी केली. त्यांनी याबद्दल संबंधित यंत्रणांकडे तक्रार केली. ही तक्रार जिल्हा स्तरावरुन टप्प्याटप्प्यात थेट माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करण्यापर्यंत पोहचली. या आरटीआय अर्जाला आलेल्या उत्तरामधून हा करोना चाचणी घोटाळा समोर आलाय. हा देशातील सर्वात मोठा करोना चाचणी घोटाळा असल्याचं सांगण्यात येत आहे.

नक्की वाचा >> आयुर्वेदातील ही वनस्पती करोना विषाणूची वाढ रोखण्यात ९८ टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरते; संशोधकांचा दावा

अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलं नाही…

मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार करोना चाचणीसंदर्भातील मेसेजमुळे त्यांना शंका आली. “माझ्या करोना चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याचा मेसेज मला आला. मात्र मी करोना चाचणी केलीच नव्हती. मी यासंदर्भात जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना भेटलो. मात्र मला काहीच मदत करता येणार नाही असं सांगण्यात आलं. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यात रस दाखवला नाही. अखेर मी शेवटचा उपाय म्हणून इंडियान काउंसिल ऑफ मेडिकल रिचर्सला ई-मेल करुन तक्रार दाखल केली,” असं मित्तल यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> Coronavirus: भारताच्या मदतीसाठी पाकिस्तानी संस्थांनी गोळा केले कोट्यावधी रुपये दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाण्याची भीती

उत्तर आलं नाही म्हणून केला आरटीआय अर्ज

आयसीएमआरने या प्रकऱणामध्ये तपास करु असं उत्तर मित्तल यांना दिलं. मात्र त्यानंतर मित्तल यांनी करोना चाचणीचा मेसेज आलेल्या प्रयोगशाळेसंदर्भातील माहिती मिळवण्याच्या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केला. आयसीएमआरने या अर्जाच्या आधारे चौकशी केली असता, मित्तल यांच्या करोना चाचणीसाठी सॅम्पल हरिद्वारमध्ये घेण्यात आला आणि तपासण्यात आल्याचं दिसून आलं. त्यानंतर मित्तल यांची तक्रार उत्तराखंड आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आली. एका मोठ्या चौकशीनंतर अशी माहिती समोर आली की मित्तल यांच्या नावाचा त्या एक लाख लोकांच्या यादीमध्ये समावेश आहे ज्यांच्या करोना चाचण्यांचे खोटे अहवाल हरयाणामधील एका एजन्सीने तयार केले होते.