पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात आठ चित्ते आणण्यात आले. नामिबियातून आणणेल्या या चित्त्यांना मध्यप्रदेशमधील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलं आहे. त्यात आता ‘आशा’ ही मादी चित्ता गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नामिबियातून आणणेल्या मादी चित्त्याने सर्वांच्या ‘आशा’ पल्लवीत केल्या आहेत.

यावरती चित्त्यांची देखभाल करणाऱ्या सीसीएच्या डॉ. लॉरी मार्कर यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, “मादी चित्ता गर्भवती असण्याची शक्यता आहे. आम्हाला याची लवकरच माहिती मिळेल. मादी गर्भवती असेल तर ही नामिबियाची आणखी एक भेट असेल. त्यामुळे मादी चित्त्याला एकांतवास आणि शांतता दिली पाहिजे,” असेही मार्कर यांनी म्हटलं.

mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
The report of the National Human Rights Commission condemned the violation of human rights under the message
संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालात ठपका
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

मात्र, कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी प्रकाश कुमार वर्मा यांनी या वृत्ताचे खंडण केलं आहे. “मादी चित्ता गर्भवती असल्याचे वृत्त खोटे आहे. या मादी चित्त्याची कोणताही चाचणी करण्यात आली नाही. अथवा त्याप्रकारचा अहवाल नामिबीयातून प्राप्त झाला नाही आहे. हे वृत्त कसे प्रसारित झाले, याची मला माहिती नाही,” असे प्रकाश कुमार वर्मा स्पष्ट केलं.