पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात आठ चित्ते आणण्यात आले. नामिबियातून आणणेल्या या चित्त्यांना मध्यप्रदेशमधील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलं आहे. त्यात आता ‘आशा’ ही मादी चित्ता गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नामिबियातून आणणेल्या मादी चित्त्याने सर्वांच्या ‘आशा’ पल्लवीत केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावरती चित्त्यांची देखभाल करणाऱ्या सीसीएच्या डॉ. लॉरी मार्कर यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, “मादी चित्ता गर्भवती असण्याची शक्यता आहे. आम्हाला याची लवकरच माहिती मिळेल. मादी गर्भवती असेल तर ही नामिबियाची आणखी एक भेट असेल. त्यामुळे मादी चित्त्याला एकांतवास आणि शांतता दिली पाहिजे,” असेही मार्कर यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunos female cheetahs may be pregnant park official denies news ssa
First published on: 01-10-2022 at 22:18 IST