LaGuardia Airport Accident: Tragic death of pilots after Air Canada plane hits runway vehicle : न्यूयॉर्कच्या लागार्डिया (LaGuardia) विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर कॅनडा एक्सप्रेसचे विमान धावपट्टीवरील एका वाहनाला धडकल्याचा प्रकार समोर आला आहे. लागार्डिया विमानतळाच्या धावपट्टीवर सोमवारी संध्याकाळी झालेल्या या दुर्घटनेत वैमानिक आणि सहवैमानिक ठार झाले आहेत. या घटनेनंतर विमानतळावर येणारी विमाने इतर ठिकाणी वळवण्यात आली आहेत, असे वृत्त एनबीसीच्या हवाल्याने रॉयटर्सने दिले आहे.

Flightradar24 ने दिलेल्या माहितीनुसार हे विमान मॉन्ट्रियलहून आलेले CRJ-900 हे विमान ताशी सुमारे २४ मैल (३९ किमी) वेगाने त्या वाहनाला धडकले. हे विमान एअर कॅनडाची प्रादेशिक भागीदार असलेल्या जॅझ एव्हिएशन (Jazz Aviation) या कंपनीचे आहे.

या घटनेनंतर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) ने ५.३० जीएमटी वाजेपर्यंत सर्व विमाने उड्डाणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय आपत्कालीन परिस्थितीमुळे घेण्यात आला असून हा कालावधी वाढवला जाऊ शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे. FAA ने याबाबत इतर कोणताही सविस्तर तपशील अद्याप दिलेला नाही. लागार्डिया विमानतळाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, विमानतळावर येणारी विमाने इतर विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत.

एअरमनसाठी काढण्यात आलेल्या एका वेगळ्या नोटीसीमध्ये एफएएने विमानतळ १८८ जीएमटी वाजेपर्यंत बंद ठेवला जाऊ शकतो असे म्हटले आहे.

न्यूयॉर्कच्या अग्निशमन दलाने एका निवेदनात माहिती दिली की, लागार्डिया विमानतळावरील धावपट्टीवर विमान आणि वाहन यांच्यात झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर त्यांच्याकडून मदतकार्यक सुरू करण्यात आले. मात्र, यापेक्षा अधिकची माहिती त्यांनी दिली नाही, असे रॉयटर्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.