scorecardresearch

‘एनडीटीव्ही’च्या संपादकीय विभागात हस्तक्षेप करणार?; गौतम अदानी म्हणाले, “व्यवस्थापन अन्…”

अदानी समूहाने एनडीटीव्हीमध्ये ६९ टक्के भागीदारी केली आहे.

‘एनडीटीव्ही’च्या संपादकीय विभागात हस्तक्षेप करणार?; गौतम अदानी म्हणाले, “व्यवस्थापन अन्…”
गौतम अदानी ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ म्हणजेच आरआरपीआरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला आहे. ‘एनडीटीव्ही’मध्ये मोठी गुंतवणूक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी केली आहे.

अदानी समूहाने ‘एनडीटीव्ही’मध्ये आपली ६९ टक्क्यांहून अधिक भागीदारी केली आहे. याबाबत ‘एनडीटीव्ही’चे संस्थापक प्रणव रॉय आणि राधिक रॉय यांनी माहिती दिली. पण, बाकी उद्योगांसारखं ‘एनडीटीव्ही’मध्ये हस्तक्षेप करणार का? संपादकीय स्वातंत्र्य कसं राखणार? यावर आता गौतम अदानी यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “धीरुभाई अंबानी माझं प्रेरणास्थान”, गौतम अदानींनी केला खुलासा, म्हणाले “एक नम्र व्यक्ती…”

‘इंडिया टुडे’शी बोलताना गौतम अदानी यांनी सांगितलं की, “एनडीटीव्ही विश्वसनीय, स्वतंत्र आणि आंतरराष्ट्रीय माध्यम असणार आहे. व्यवस्थापन आणि संपादकीय विभाग यांच्यात एक लक्ष्मणरेषा राहणार आहे. या विषयावर चर्चा करेल तेवढं कमी आहे. जसे की अन्य काहीजण बोलत आहेत. पण, काही काळानंतर हे सर्वांच्या समोर येईल. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या,” असं गौतम अदानी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 10:27 IST

संबंधित बातम्या