scorecardresearch

लालूप्रसाद यादव यांच्यावर आज सिंगापूरमध्ये शस्त्रक्रिया, मुलगी देणार किडनी; शेअर केला रुग्णालयातील फोटो

मागील बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव आजारी आहेत.

लालूप्रसाद यादव यांच्यावर आज सिंगापूरमध्ये शस्त्रक्रिया, मुलगी देणार किडनी; शेअर केला रुग्णालयातील फोटो
लालूप्रसाद यादव आणि त्यांची मुलगी रोहिणी आचार्य (फोटो-ट्विटर, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मागील बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव आजारी आहेत. आज (५ डिसेंबर) त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. विशेष म्हणजे लालूप्रसाद यांना त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. आज ही प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडणार आहे. खुद्द रोहिणी आचार्य यांनी याबाबतची माहिती दिली असून रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा >>> पोटच्या लेकीशी लग्न, १५ वर्षीय मुलींशी सामूहिक शरीरसंबंध अन्.. देवाच्या नावावर केलेलं लज्जास्पद कृत्य उघड

मागील बऱ्याच दिवसांपासून लालूप्रसाद यादव वेगवेगळ्या आजारांशी लढत होते. त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही शस्त्रक्रिया आज सिंगापूरमध्ये पार पडणार आहे. सर्व चाचण्या केल्यानंतरच या शस्त्रक्रियेला परवानगी देण्यात आली आहे. रोहिणी आचार्य सिंगापूरमध्ये राहतात.

हेही वाचा >>> Gujarat election 2022 :काँग्रेसचा बेपत्ता उमेदवार हजर; भाजपाच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार आपल्या मुलीकडून किडनी घेण्यास लालूप्रसाद यादव तयार नव्हते. मात्र रोहिणी यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी या शस्त्रक्रियेस सहमती दर्शवली. सिंगापूरमधील सेंटर फॉर किडनी डिसीज येथे लालूप्रसाद यादव यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 11:50 IST

संबंधित बातम्या