सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत, तसेच वायू प्रदूषण वाढत आहे. नैसर्गिक महामारी, मानसिक आरोग्य, धूम्रपान अशा अनेक मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. ज्यामुळे मानव जातीसमोर मोठे धोके निर्माण होत आहेत. या होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने एका नव्या आंतरराष्ट्रीय अहवालाने जागतिक आरोग्याला असलेल्या मोठ्या धोक्यांचा इशारा दिला आहे.

या अहवालाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील काही वर्षांत मानवासमोरील १७ विनाशकारी धोके सांगण्यात आले आहेत. ‘द लॅन्सेट’ या अहवालातून २१०० सालापर्यंत होणारे मानवासमोरील १७ विनाशकारी धोके सांगण्यात आले आहेत. यामध्ये एआयचा घातक वापर, अणुयुद्धामुळे मानवजातीच्या विनाशाचा धोका आणि जैविक शस्त्रांचा धोका अशा वेगवेगळ्या मुद्यांचा समावेश आहे. या संदर्भातील वृत्त द गार्डियनने दिलं आहे.

दरम्यान, ‘द लॅन्सेट’ या अहवालातून काय इशारा देण्यात आला? मानवाच्या अस्तित्वाला खरंच धोका निर्माण होऊ शकतो का? मानवासमोरील १७ सर्वात मोठे धोके कोणते? ‘लॅन्सेट’ने नेमकी काय इशारा दिला आहे? याबाबत जाणून घेऊयात.

‘द लॅन्सेट’चा हा अहवाल पुढील ७५ वर्षांत मानवी आरोग्य आणि अस्तित्वासाठीच्या १७ प्रमुख धोक्यांबाबत गंभीर इशारा देत आहे. यामध्ये अणुयुद्ध, एआय (AI) चा गैरवापर, हवामान बदल, वायू प्रदूषण, बाल-कुपोषण, लठ्ठपणा आणि आंतरराष्ट्रीय मदत यासह आदी मुद्यांचा समावेश असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

मानवासमोरील धोके कोणते? अहवालात काय म्हटलंय?

‘द लॅन्सेट’च्या अहवालात विविध मुद्यांचा समावेश आहे. यामध्ये पुढील ७५ वर्षांत मानवी आरोग्य आणि अस्तित्वासाठीच्या १७ प्रमुख धोक्यांबाबत सांगण्यात आलं आहे. अणुयुद्ध, एआय (AI) चा गैरवापर, हवामान बदल, वायू प्रदूषण, कुपोषण, लठ्ठपणा आणि आंतरराष्ट्रीय मदत, औषध-प्रतिकार शक्ती, आरोग्य, युद्ध, मद्यपानाचा वाढता वापर, उच्च रक्तदाब, उत्पन्नातील असमानता, शिक्षण, नैसर्गिक महामारी, मानसिक आरोग्य या मुद्यांचा समावेश आहे.

दरम्यान, असं घडण्याची शक्यता कमी असली तरी तज्ज्ञांनी असा इशारा दिला की, अशा प्रकारचे धोके टाळण्यासाठी जागतिक पातळीवर आतापासूनच ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, ३५ तज्ज्ञांच्या समितीने तयार केलेला आणि जर्मनीतील बर्लिन येथे होणाऱ्या जागतिक आरोग्य परिषदेत सादर केला जाणारा हा महत्वाचा अहवाल असणार आहे.