Lehra Do Tiranga Protest Updates: कॉक्रोच जनता पार्टीचे सह-संयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्यामागणीसाठी आज नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील सेंट्रल पार्क येथे ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चाची हाक देण्यात आली होती. या मोर्चासाठी अभिजीत दिपके जात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

सदर मोर्चा रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सेंट्रल पार्क आणि राजीव चौक मेट्रो स्थानक परिसरात नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, नवी दिल्ली आणि लगतच्या भागांत २५ हजारांहून अधिक पोलीस व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पाच हजार जवानांना पाचारण करण्यात आले असून, पालिका बाजार, संसद मार्ग आणि टॉलस्टॉय मार्ग परिसरात आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी सुमारे १६ हून अधिक बस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

अभिजीत दिपके करोल बाग येथील घरातून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Live Updates

Abhijeet Dipke Detained by Delhi Police | Lehra Do Tiranga Protest Live Updates

20:01 (IST) 16 Oct 2026

Lehra Do Tiranga Protest Live Updates: दिल्लीत धरपकड, मुंबईत फारसा प्रतिसाद नाही; CJP च्या मोर्चात काय घडलं?

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनात वेगवेगळे चित्र दिसले. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात जवळपास २,००० आंदोलक जमल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. याशिवाय अभिजीत दिपके आणि नेहा बोरासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले गेले. मात्र मुंबईत सीजेपीच्या आंदोलनाला फारशी गर्दी झाली नाही. आझाद मैदानातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र आंदोलकांची गर्दी कमी होती.

https://twitter.com/ANI/status/2111035202055323873

19:23 (IST) 16 Oct 2026

Abhijeet Dipke Detained Live Updates: 'राष्ट्रध्वजाला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे', अरविंद केजरीवाल यांची टीका

आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल सरकारचा निषेध व्यक्त केला. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "आपल्या देशात आपण राष्ट्रध्वज फडकवायचा नाही तर पाकिस्तानात फडकवायचा का? ज्याना भारतीय राष्ट्रध्वजाची अडचण आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावे."

https://twitter.com/ArvindKejriwal/status/2111082780641914892

18:49 (IST) 16 Oct 2026

Abhijeet Dipke Detained Live Updates: 'राष्ट्रद्रोही पंतप्रधानच राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या तरूणांना ताब्यात घेऊ शकतो', ध्रुव राठीची टीका

अभिजीत दिपके आणि नेहा बोरा यांना राष्ट्रध्वज फडकवण्याच्या आधीच पोलीसांनी ताब्यात घेतले. यानंतर यूट्यूबर ध्रुव राठीने संताप व्यक्त केला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले, 'राष्ट्रद्रोही पंतप्रधानच राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या तरूणांना ताब्यात घेऊ शकतो'

https://twitter.com/dhruv_rathee/status/2111079127600312597

18:31 (IST) 16 Oct 2026

Abhijeet Dipke Detained Live Updates: जेएनयू, दिल्ली विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी सेंट्रल पार्कच्या दिशेने निघाले

अभिजीत दिपके आणि नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्यानंतर दिल्लीतील जेएनयू, दिल्ली विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयातील डाव्या विद्यार्थी संघटनांशी संलग्न विद्यार्थी सेंट्रल पार्कच्या दिशेने एकत्र निघाले आहेत.

18:13 (IST) 16 Oct 2026

'मोदी-शाह किती लोकांना अटक करणार? आणखी लोक बाहेर येतील', अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीचा इशारा

Abhijit Dipke Detained: दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे 'लहरा दो तिरंगा' मोर्च्यापूर्वी अभिजीत दिपके आणि विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...अधिक वाचा
18:01 (IST) 16 Oct 2026

Abhijeet Dipke Detained Live Updates: नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतरही सेंट्रल पार्क परिसरात मोठी गर्दी

सीजेपीचे नेते अभिजीत दिपके आणि विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्यानंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी तिरंगा मोर्चा सुरू ठेवला आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन करत राहू असे आपचे नेते गोपाल राय म्हणाले.

https://twitter.com/PTI_News/status/2111071931457994862

17:48 (IST) 16 Oct 2026

Abhijeet Dipke Detained Live Updates: राष्ट्रध्वज फडकविणाऱ्या तरुणांना हे सरकार का घाबरते? सीजेपीला सवाल

अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स हँडलवरून टीका करण्यात आली आहे. सरकार राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या तरुणांना इतके का घाबरते? असा प्रश्न उपस्थित करत खाली हुकूमशाह असे लिहिण्यात आले आहे.

https://twitter.com/Cockroachisback/status/2111061802041872528

17:40 (IST) 16 Oct 2026

Abhijeet Dipke Detained Live Updates: नेहा बोरा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

अभिजीत दिपके यांच्यानंतर विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंडी हाऊस येथे आज तिरंगा फडकवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र तत्पूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

https://twitter.com/NehaAisa/status/2111065172060291523

17:34 (IST) 16 Oct 2026

Abhijeet Dipke Detained Live Updates: अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतल्यानंतर 'आप'तर्फे तिरंगा फडकविण्यात आला

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी तिरंगा घेत मोर्चात सहभाग घेतला आहे.

https://twitter.com/ANI/status/2111063694146965610

17:16 (IST) 16 Oct 2026

Abhijeet Dipke Detained Live Updates: तिरंगा मोर्चासाठी सीजेपीकडून आम्हाला कोणतेही निवेदन नाही - दिल्ली पोलीस

सेंट्रल पार्क येथे राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी सीजेपीकडून कोणतेही निवेदन प्राप्त झालेले नाही किंवा त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांचे अतिरीक्त आयुक्त आणि जनसंपर्क अधिकारी राजीव रंजन यांनी दिली. राष्ट्रध्वज फडकविण्याची संहिता ठरलेली आहे. राष्ट्रध्वज अत्यंत आदराने फडकवला गेला पाहिजे.

https://twitter.com/ANI/status/2111059703770099988

17:11 (IST) 16 Oct 2026
Abhijeet Dipke Detained Live Updates: तिरंगा मोर्चा काढण्यावर इतर आंदोलक ठाम

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी तिरंगा मोर्चापूर्वीच ताब्यात घेतले असले तरी सेंट्रल पार्कजवळ जमलेले आंदोलक तिरंगा मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. त्यांनी म्हटले अभिजीतला ताब्यात घेतले असले तरी आम्ही तिरंगा फडकवणारच.

17:02 (IST) 16 Oct 2026

Abhijeet Dipke was detained by Delhi Police: तिरंगा मोर्चासाठी घरातून निघाल्यानंतर अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात

करोल बाग येथील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरातून अभिजीत दिपके कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क येथे तिरंगा मोर्चासाठी निघाले असता दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

16:52 (IST) 16 Oct 2026
Abhijeet Dipke Detained Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीच्या सेंट्रल पार्क येथे तिरंगा मोर्चाची सुरुवात होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे. ते सेंट्रल पार्कच्या दिशेने निघालेले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

https://twitter.com/PTI_News/status/2111058324733259782

16:44 (IST) 16 Oct 2026

प्रशांत भूषण यांच्या सत्ता उलथवून लावण्याच्या विधानावर अभिजीत दिपकेंचे उत्तर; आंदोलनामागचा हेतू सांगताना म्हणाले...

Abhijeet Dipke on Prashant Bhushan Statement: दिल्लीतील पत्रकार परिषदेत वकील प्रशांत भूषण यांनी 'सत्ता उलथवून लावू' (रिजीम चेंज) असे विधान केल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे. ...सविस्तर बातमी
15:58 (IST) 16 Oct 2026
Abhijeet Dipke Detained Live Updates: तिरंगा मोर्चाच्या आधी कॅनॉट प्लेसमध्ये पोलिसांची संख्या वाढवली

दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे सायंकाळी ५ वाजता तिरंगा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी पोलिसांची संख्या वाढवली गेली आहे.

https://twitter.com/IndianExpress/status/2111038786847309982

15:43 (IST) 16 Oct 2026

Delhi Protest Live Updates: '२० जुलैची पुनरावृत्ती होणार नाही', दिल्ली पोलिसांचे आश्वासन

सीजेपीतर्फे आज होणाऱ्या लहरा दो तिरंगा मोर्चादरम्यान पोलीस आणि सुरक्षा दलाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून २० जुलैची पुनरावृत्ती होऊ नये, याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. २० जुलैच्या संसद चलो मोर्चात मोठ्या प्रमाणावर आंदोलक जंतर-मंतरवर एकत्र आल्यामुळे परिस्थिती चिघळली होती. तसा प्रकार यावेळी होऊ देणार नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

14:57 (IST) 16 Oct 2026

Delhi Protest Live Updates: दिल्लीत आंदोलन करू नका, पोलिसांची अभिजीत दिपके यांना नोटीस

दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना नोटीस बजावली असून दिल्लीत आंदोलन करू नये, असे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्त्यांच्या घरी अभिजीत दिपके थांबले आहेत. या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

14:00 (IST) 16 Oct 2026

Delhi Protest Live Updates: अभिजीत दिपके दिल्लीत थांबलेल्या घराबाहेर पोलीस पोहोचले; अटक होणार?

सीजेपीचे संस्थापक दिल्लीत ज्या ठिकाणी थांबले आहेत, त्याठिकाणी दिल्ली पोलीस पोहोचले असून अभिजीत दिपके यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना आंदोलन करण्याची परवानगी नाही, असे सांगण्यात येत आहे. अभिजीत दिपके यांनी कालच त्यांना अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली होती.

https://www.instagram.com/cockroachjantaparty/live/?broadcast_id=17911580229551045

13:57 (IST) 16 Oct 2026

Delhi Protest Live Updates: सेंट्रल पार्कच्या आत आणि बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सीजेपीच्या मोर्चाआधी दिल्लीच्या सेंट्रल पार्कमध्ये आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

13:40 (IST) 16 Oct 2026

दिल्लीतील आंदोलनावर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; अभिजीत दिपकेंचे व्यापाऱ्यांच्या नुकसानावर भाष्य

Supreme Court Connaught Place Protest: सीजेपीच्या तिरंगा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क बंद करण्याच्या विरोधात तातडीची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ...सविस्तर बातमी

Supreme Court Connaught Place Protest CJP Hearing | Delhi Police Security Central Park Connaught Place

दिल्लीतील सेंट्रल पार्क येथे आज सीजेपीकडून तिरंगा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.