कसौली येथे भरविण्यात येणाऱ्या  खुशवंत सिंग लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये यंदापासून दरवर्षी ‘खुशवंत सिंग मेमोरिअल बुक प्राइझ’ हा पुरस्कार दिला जाणार असून पदार्पणातील काल्पनिक कादंबरी लेखकाला तो देण्यात येईल. अडीच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लेखक सुहेल सेठ यांनी पुरस्कृत केलेला हा पुरस्कार असून त्यासाठी ऑक्सफर्ड बुकस्टोअरने सहकार्य केले आहे. रोख पुरस्काराव्यतिरिक्त देशभरातील ऑक्सफर्ड बुकस्टोअर्सच्या दुकानांना भेटी देण्याची संधी विजेत्या लेखकाला मिळणार आहे.
‘‘खुशवंत सिंग यांना १९८२ मध्ये मी भेटलो आणि तेव्हापासून त्यांचा मी चाहता बनलो. रसपूर्णतेने जीवन जगण्याची त्यांची तीव्र इच्छा ही एक गोष्ट आपण त्यांच्याकडून घेतली. म्हणूनच दरवर्षी भारतीय इंग्रजी लेखकाच्या पहिल्या काल्पनिक कादंबरीची निवड या पुरस्कारासाठी केली जाणार आहे. पुरस्कार विजेते मान्यवर लेखक या पुरस्कारासाठी लेखक व कादंबरीची निवड करतील, अशी माहिती सुहेल सेठ आणि जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या संचालिका नमिता गोखले यांनी दिली.