आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र न्यूयार्क टाईम्सने इस्राईलमधील एनसओ कंपनीने निर्माण केलेल्या पेगॅसस या हेरगिरी स्पायवेअरबाबत (Pegasus Spyware) गंभीर खुलासे केले आहेत. यात भारतासह काही देशांनी पेगसेस स्पायवेअरची खरेदी केल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे पेगसेस खरेदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१७ मधील इस्राईल भेटीचाही संबंध असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे भारतात काँग्रेससह विरोधकांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत.

Live Updates
17:02 (IST) 29 Jan 2022
“हे ब्रिटन किंवा अमेरिकेत घडलं असतं, तर सरकारला राजीनामा द्यावा लागला असता”

संजय झा म्हणाले, “हे जर ब्रिटन किंवा अमेरिकेत घडलं असतं, तर तिथं सरकारला राजीनामा द्यावा लागला असता. भारतातील विरोधकांनी आत्ताच आपली क्षमता दाखवायला हवी.”

16:53 (IST) 29 Jan 2022
निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाची हेरगिरी अक्षम्य, हे सरकार बरखास्त गेलं पाहिजे : सिताराम येचुरी

16:47 (IST) 29 Jan 2022
हे सरकार आपल्याच लोकांवर पाळत का ठेवत आहे? : के. सी. वेणुगोपाल

16:44 (IST) 29 Jan 2022
राहुल गांधी २३ जुलै २०२१ रोजी काय म्हणाले होते ते पाहा : सतेज पाटील

16:41 (IST) 29 Jan 2022
पेगसेस प्रकरणी युवक काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन

15:57 (IST) 29 Jan 2022
मोदी सरकारचं खोटं बोलणं पकडलं गेलं, सर्वोच्च न्यायालयाचीही दिशाभूल : मल्लिकार्जून खरगे

लोकसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे म्हणाले, “मोदी सरकारचं संसदेसोबत बोललेलं खोटं पकडलं गेलं आहे. मोदी सरकारने आमचा पेगसेसशी काहीही संबंध नाही आणि आम्ही कधीही इस्राईलच्या एनएसओ कंपनीकडून स्पायवेअर खरेदी केलं नाही, असा दावा केला होता. हे खोटं पकडलं गेलं आहे.”

“याशिवाय मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाचीही दिशाभूल केली. आम्ही हा मुद्दा जोरकसपणे संसदेत उपस्थित करू आणि या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांची जबाबदारी निश्चित होईल यासाठी प्रयत्न करू,” असंही मल्लिकार्जून खरगे यांनी नमूद केलं.

14:08 (IST) 29 Jan 2022
हेरगिरी करणारं स्पायवेअर वापराची परवानगी मोदी सरकारमध्ये कोणी दिली? : पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तामुळे मोदी सरकारने हेरगिरी करणारं पेगसेस स्पायवेअर इस्राईलकडून खरेदी केल्याचं आणि पत्रकार, मंत्री आणि विरोधी राजकीय नेत्यांसाठी वापरल्याचं स्पष्ट झालंय. आता सरकारने हे हेरगिरी करणारं स्पायवेअर कोणत्या गुप्तहेर संस्थेला दिलं होतं आणि याची परवानगी कोणी दिली होती याचं उत्तर द्यावं.”

“आता सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे. सर्वोच्च न्यायालयाने पेगसेस प्रकरण गांभीर्याने घेतलंय. यात मोदी सरकारची भूमिका आणि बेकायदेशीर हेरगिरीचा भारतीय लोकशाहीला असलेला धोका स्पष्ट होईल. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी गुप्तचर संस्थांच्या चौकशीबाबत संसदेला काही दिशानिर्देश देईल, अशी आहे आहे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

13:23 (IST) 29 Jan 2022
सखोल तपासात भारताने पेगसेस खरेदी केल्याचं सिद्ध : मोहुआ मोईत्रा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोहुआ मोईत्रा यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

13:08 (IST) 29 Jan 2022
देशातील सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षा भयंकर, लोकशाही कुठं आहे? : संजय राऊत

13:04 (IST) 29 Jan 2022
मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि संसदेची दिशाभूल केली : सुब्रमण्यम स्वामी

13:02 (IST) 29 Jan 2022
“भाजपा है तो मुमकिन है, देश को बिग बॉस का शो बना डाला है” : प्रियंका चतुर्वेदी

13:00 (IST) 29 Jan 2022
चौकीदारच ‘जासूस’ आहे : श्रीनिवास बी. व्ही.

काँग्रेस नेते श्रीनिवास बी. व्ही यांनी भारताने पेगसेस खरेदी केल्याची बातमी ट्वीट करत चौकीदारच जासूस आहे असं म्हटलंय.

12:58 (IST) 29 Jan 2022
या बेकायदेशीर हेरगिरीत पंतप्रधान मोदींचा सहभाग : रणदीप सिंह सुरजेवाला

रणदीप सुरजेवाला म्हणाले, “नव्या खुलाशाने काँग्रेस पक्ष आधीपासून म्हणत होता तेच सिद्ध झालंय. मोदी सरकारने पेगसेस खरेदी केली आणि त्याचा बेकायदेशीर आणि असंवैधानिक हेरगिरीसाठी वापर केला. पंतप्रधान मोदींचा या हेरगिरीत सहभाग आहे.”

12:51 (IST) 29 Jan 2022
मोदी सरकारने लोकशाहीचं अपहरण केलं : रणदीप सिंह सुरजेवाला

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारने लोकशाहीचं अपहरण केल्याचा आरोप केलाय.

LIVE: Congress Party Briefing by Shri @kharge & Shri @rssurjewala at the AICC HQ. https://t.co/IR6p4Ghpuy

— Congress (@INCIndia) January 29, 2022

12:43 (IST) 29 Jan 2022
मोदी सरकारने देशद्रोह केलाय : राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकारने आपल्या लोकशाहीच्या प्रमुख संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगसेस स्पायवेअर खरेदी केलं होतं. फोनन टॅप करून सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष, सैन्य, न्यायपालिका सर्वांना लक्ष्य केलंय. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केलाय.

मोदी सरकार ने हमारे लोकतंत्र की प्राथमिक संस्थाओं, राज नेताओं व जनता की जासूसी करने के लिए पेगासस ख़रीदा था। फ़ोन टैप करके सत्ता पक्ष, विपक्ष, सेना, न्यायपालिका सब को निशाना बनाया है। ये देशद्रोह है।

मोदी सरकार ने देशद्रोह किया है। pic.twitter.com/OnZI9KU1gp
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 29, 2022
12:31 (IST) 29 Jan 2022
“मोदी सरकारने करदात्यांचे १५ हजार कोटी राजकीय हेरगिरीसाठी वापरले”