झारखंड व जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास रविवारी सकाळी सुरूवात झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी मतदान होत असून १८२ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल. १८९० मतदान केंद्रावर १४ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. झारखंडमध्ये १५ जागांसाठी मतदान होत असून ५ हजार ४८२ मतदान केंद्रावर एकूण ४३ लाखांपेक्षा अधिक मतदार मतदान करतील.
दहशतवादी आणि नक्षलवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यंदा प्रथमच येथील मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये ४ टक्के तर झारखंडमध्ये १३.५ टक्के मतदान झाले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2014 रोजी प्रकाशित
झारखंड, काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात
झारखंड व जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास रविवारी सकाळी सुरूवात झाली.

First published on: 14-12-2014 at 12:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live phase four of voting begins in jharkhand and jk jharkhand records over 13 polling till 9 am