लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारून अवघे काही आठवडेच झाले होते. पुढील आठवड्यात नव्या पंतप्रधानांची निवड करण्यात येईल. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रिटनमधील महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी काही धोरणांची अंमलबजावणी केली. मात्र त्यांनी ब्रिटनचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा आठवड्यांत त्यांनी पक्षाचा विश्वास गमावला आहे. याच कारणामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>>> १३४८ कोटींचं घर! अंबानींची दुबईत ‘दिवाळी शॉपिंग’; या वर्षातील दुबईमधील दुसरी घरखरेदी, नव्या घराचं कुवैतशी खास कनेक्शन

लिझ ट्रस यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र अवघ्या ४५ दिवसांमध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये अन्नधान्यांच्या दरांमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. याच कारणमुळे येथील महागाई ४० वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात झालेली दरवाढ ही १९८०नंतरची सर्वात मोठी असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे आर्थिक आणि राजकीय संकटात असलेल्या लिझ ट्रस सरकारसमोर महागाईवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. ब्रिटनमधील महागाई आणि राबवलेल्या अर्थविषयक धोरणामुळे लिझ यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

हेही वाचा >>>> Covid 19: करोना अद्यापही संपलेला नाही, WHO चं मोठं विधान; जाणून घ्या पाच महत्त्वाचे मुद्दे

महिन्याभरताच पायउतार

गेल्या महिनाअखेरीस ट्रस यांनी मांडलेला ‘छोटा अर्थसंकल्प’ वादात सापडला. त्यानंतर त्यातील तरतुदी मागे घेण्याची नामुष्की अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांच्यावर आली. वादग्रस्त ‘छोटय़ा अर्थसंकल्पा’मधील कररचनेवर माघार घ्यावी लागत असल्याने ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी केली. यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर ट्रस या महिन्याभरताच पायउतार झाल्या आहेत.

हेही वाचा >>>>Viral Audio: जयललिता यांच्या मृत्यूच्या तपासाला नवं वळण, व्हायरल ऑडिओमुळे शशिकला यांच्यावर संशय बळावला

“कंझर्व्हेटिव्ह पक्षातर्फे माझी नेता म्हणून निवड झाली होती. मात्र मी दिलेली आश्वसाने पूर्ण करू शकले नाही. मी माझ्या पक्षाचा विश्वास गमावला आहे. याच कारणामुळे पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत आहे. मी सर ग्रॅहम ब्रॅडी यांची भेट घेतली आहे. पुढील आठवड्यात आगामी नेतृत्वाची निवड केली जाईल. देशाची आर्थिक स्थिरता तसेच राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,” असे लिझ ट्रस पंतप्रधानपदाचा राजीनामा देताना म्हणाल्या आहेत.