गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान सक्तीचे?

गुजरातमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान सक्तीचे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुजरात प्रशासनाने घेतला आहे.

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi pmc election 2017 election percentage voting in pune smart city
मध्यवर्ती भागात मतदानाची टक्केवारी वाढली आहे

गुजरातमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान सक्तीचे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुजरात प्रशासनाने घेतला आहे. यासाठी गुजरात सरकार आता कायदा आणण्याच्या तयारीत आहे. हा कायदा लागू झाल्यास राज्यातील १८ वर्षांवरील नोंदणीकृत मतदारांनी मतदान न केल्यास त्यांना दंड आकारण्यात येईल.  ऑक्टोबरमध्ये गुजरातमधील सात महानगरपालिका आणि ३०० पालिकांसाठी निवडणूक होत आहे. मतदारांनी यापासून कोणतीही पळवाट काढू नये, यासाठी प्रशासनातर्फे ऑनलाईन मतदानाचा पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, यंदाच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाचा ५० टक्के जागांवर महिला उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, या मतदान सक्ती कायद्याचा मसुदा बनवणाऱ्या समितीचे प्रमुख के.सी.कपूर यांनी आम्ही आमचा अहवाल सरकारकडे जमा केल्याचे सांगितले. आता सरकारकडून या कायद्याची अधिसूचना काढून त्यावर लोकांच्या हरकती मागवल्या जातील. त्यानंतरच या कायद्याला अंतिम स्वरूप मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Local body elections gujarat to notify compulsory vote law 50 percent women candidates

ताज्या बातम्या