हरयाणात क्रिकेट प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या

बाईकवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी सुमीतच्या डोक्यात ३ तर अंगावर दोन गोळ्या झाडत घटनास्थळावरुन पोबारा केला.

सुमीतच्या जाण्यामुळे परिसरावर शोककळा

हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यात क्रिकेट प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे. सुमीत बधवार असं या प्रशिक्षकाचं नाव असून या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. बाईकवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी सुमीतच्या डोक्यात ३ तर अंगावर दोन गोळ्या झाडत घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेची तातडीने दखल घेत हरयाणा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमीतने दोन महिन्यांपुर्वीच खारखोडा गावातील प्रताप हायस्कुलमध्ये क्रिकेट प्रशिक्षकाची नोकरी स्विकारली होती. मंगळवारी आपल्या शाळेतील संघासोबत सराव झाल्यानंतर सुमीत घराकडे जात असताना दोन हल्लेखोरांनी सुमीतवर जीवघेणा हल्ला केला आहे. सुमीतच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे गावात सर्वांशी चांगले संबंध होते. कोणासोबतही त्याचं भांडण झालेलं नव्हतं, त्यामुळे त्याची हत्या कोणी का करेलं हे कोडचं आहे. सध्या पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Local cricket coach shot dead in sonipat district of haryana