झारखंडमझील पलामू जिल्ह्यात एका नवविवाहित दांपत्याची कार रविवारी नदीत कोसळली. कारमध्ये यावेळी अजून तीन लोक उपस्थित होते. गावकऱ्यांनी कार नदती बुडत असल्याचं पाहून वाचवण्यासाठी धाव घेत नदीत उड्या मारल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून गावकरी नदीत उतरले असून नदीत बुडत असलेली कार आहे तिथेच रोखण्याचा प्रयत्न करत त्यामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहसोहळा संपल्यानंतर घरी परतत असताना कार पुलावरुन थेट खाली नदीत कोसळली. नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने कारही त्यातून वाहून केली. जवळपास अर्ध्या किमीर्यंत कार वाहून गेली होती. गावकऱ्यांनी कार बुडत असल्याची दिसताच त्यांनी धाव घेतली आणि काचा फोडून अडकलेल्यांना बाहेर काढलं. जोरदार पावसामुळे झारखंडमध्ये सध्या अनेक ठिकाणी पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर गावकऱ्यांचं कौतुक केलं जात आहे.