लोकसत्ता निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात शनिवारी मतदान होत आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंह ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. आज मतदान संपणार असल्याने सर्वांच्या नजरा शनिवारी संध्याकाळी होणाऱ्या मतदानोत्तर चाचण्यांवर व ४ जूनला लागणाऱ्या निकालांवर असतील.

अखेरच्या टप्प्यात पंजाबमधील सर्व १३, हिमाचल प्रदेशातील सर्व चार, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील नऊ, बिहारमधील आठ, ओडिशातील सहा, झारखंड व चंदीगडमधील प्रत्येकी तीन जागांवर मतदान होणार आहे. ओडिशाच्या उर्वरित ४२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार असून हिमाचल प्रदेशातील सहा विधानसभा जागांसाठीही पोटनिवडणूक होणार आहे.

Farmers Participation in Crop Insurance Scheme, Crop Insurance Scheme, Farmers Participation in Crop Insurance Scheme Declines, Ladki Bahin Yojana Applications, latest news, marathi news, loksatta news
‘लाडक्या बहिणी’चा पीक विम्‍याला फटका! केवळ ३.३६ लाख शेतकऱ्यांचा सहभाग, अखेर…
India Post GDS Recruitment 2024
India Post GDS Recruitment 2024 : ४४,०० पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी होणार भरती, लवकर करा अर्ज, जाणून घ्या पात्रता-निकष
nagpur, higher studies, free admission,
उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जात आहात, शासकीय वसतिगृहांमध्ये मोफत प्रवेशाचा लाभ घ्या, मुलींसाठीही संधी, या तारेखपर्यंत…
Record volume of supplemental demands Demands of around one lakh crores for various schemes print politics news
पुरवणी मागण्यांचे आकारमान विक्रमी? विविध योजनांसाठी सुमारे एक लाख कोटींच्या मागण्या
Recruitment, MPSC,
‘एमपीएससी’कडून सरळसेवा भरती, फडणवीसांच्या घोषणेमुळे समाधान, मात्र ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन…
pune zika virus latest marathi news
पुणे: झिकाचा धोका कायम; एरंडवणा, मुंढव्यातील २० जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले
Doctors Engineers and Teachers apply for Police Constable Recruitment
पोलीस शिपाई भरतीसाठी डॉक्टर, अभियंते, शिक्षक मैदानात; पिंपरी शहर पोलीस दलात २६२ जागांसाठी १५ हजार अर्ज
Pimpri, applications,
पिंपरी: पोलीस शिपाई पदाच्या २६२ जागांसाठी किती अर्ज? आजपासून भरतीप्रक्रिया

हेही वाचा >>> शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी मनमोहन सिंग यांचे जनतेला उद्देशून पत्र; म्हणाले, “लोकशाही वाचवण्यासाठी…”

शनिवारी एकूण ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. बसपाने सर्वाधिक ५६ उमेदवार उभे केले आहेत, त्यापाठोपाठ भाजपने ५१ आणि काँग्रेसने ३१ उमेदवार उभे केले आहेत. संपूर्ण पंजाबमधील मतदानासह, राज्यात या टप्प्यात सर्वाधिक ३२८ उमेदवार आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेशातील १३ जागांसाठी १४४ उमेदवार आहेत. बिहारमध्ये ८ जागांसाठी १३४, तर पश्चिम बंगालमध्ये ९ जागांसाठी १२४ उमेदवार आहेत.

उकाडा किंवा पावसाचा मतदानावर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

मतदानोत्तर चाचणी चर्चेपासून काँग्रेस दूर

नवी दिल्ली : काँग्रेसने दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कोणत्याही लोकसभा मतदानोत्तर चाचणी चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. टीआरपीसाठी अनुमान लावत चढाओढ निर्माण करण्यात काँग्रेस सहभागी होऊ इच्छित नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी म्हटले आहे. ‘‘कोणत्याही चर्चेचा उद्देश लोकांना माहिती देणे हा असावा. आम्ही ४ जूनपासून चर्चेत आनंदाने भाग घेऊ,’’ असे खेरा यांनी म्हटले आहे.

महत्त्वाचे उमेदवार

नरेंद्र मोदीभाजप (वाराणसी, उत्तर प्रदेश)

अनुराग ठाकूरभाजप (हमीरपूर, हिमाचल प्रदेश)

अभिषेक बॅनर्जीतृणमूल काँग्रेस (डायमंड हार्बर, प. बंगाल)

कंगना राणावतभाजप (मंडी, हिमाचल प्रदेश)

विक्रमादित्य सिंहकाँग्रेस (मंडी, हिमाचल प्रदेश)

आनंद शर्माकाँग्रेस (कांगडा, हिमाचल प्रदेश)

मीसा भारतीराजद (पाटलीपुत्र, बिहार)