लोकसभा सभापती ओम बिर्ला कोविड पॉझिटिव्ह, उपचारासाठी एम्समध्ये दाखल

गेल्या २४ तासांत भारतामध्ये, ४३,८४६ नवीन प्रकरणांची नोंद झाली

छायाचित्र सौजन्य: इंडियन एक्सप्रेस

कोरोना संसर्गाची गती पुन्हा एकदा वाढत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळले आहेत. तो एम्समध्ये दाखल आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

एम्सने प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तानुसार, बिर्ला यांनी १९ मार्च रोजी केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि दुसर्‍याच दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “ते स्थिर आहेत आणि त्याचे सगळे रिपोर्ट सामान्य आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.

बिर्ला यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे संसदेच्या सध्याच्या अधिवेशनावर याचा कसा परिणाम होईल हे केवळ वेळच सांगेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रह्लाद पटेल यांच्यासह ३० खासदारांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या वर्षी संसदेचे पावसाळी अधिवेशन रद्द करण्यात आले होते.

गेल्या २४ तासांत भारतामध्ये, ४३,८४६ नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली असून २५ नोव्हेंबरपासूनची एका दिवसातली ही सर्वात मोठी रूग्णसंख्या ठरली आहे. देशातील एकूण प्रकरणांची संख्या १.१५ कोटींपेक्षा जास्त आहे. देशात आता 3.०९ लाखांहून अधिक अॅक्टीव प्रकरणे आहेत तर १.११ कोटी लोक बरे झाले आहेत. रविवारी महाराष्ट्रात २७,१२६ नवीन रुग्ण आढळले.

१९७ नवीन मृत्यूंसह मृतांचा आकडा आता १.५९ लाखांवर गेला आहे. नवीन कोविड -१९ मधील मृत्यूंपैकी सहा राज्यांचा वाटा ८६.८ टक्के आहे आणि रविवारी महाराष्ट्रात ९२ जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले आहेत की, लोकांनी व्हायरसपासून स्वत:चे संरक्षण करावे आणि जर लोकांनी सावधगिरी बाळगली नाही तर परिस्थिती धोकादायक बनू शकते. “आता लस उपलब्ध झाल्यामुळे लोकांना असे वाटते की त्यांनी मास्क घालायचे नाहीत. जास्तीत जास्त लोक त्यांच्या गळ्याला मास्क लावून ठेवताना दिसत आहेत, काहीजण तर मास्क त्यांच्या खिशात ठेवतात आणि काही जण ते वापरत नाहीत, ”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lok sabha speaker om birla tests positive for covid sbi

ताज्या बातम्या