ब्रिटीश मेडीकल जर्नलने दिलेल्या माहितीनुसार तीस वर्षांहून अधिक काळ कामावर रात्रपाळी केल्याने स्तनाचा कर्करोग बळावण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. कॅनेडीयन संशोधकांनी एकूण १,१३४ स्तनाचा कर्करोग झालेल्या स्त्रियांचे परिक्षण केले. यावरून रात्रपाळी केल्याने कर्करोग बळावत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
त्यामुळे स्त्रियांनी रात्रपाळी कामवर जाणे आरोग्याला धोकादायक असल्याचेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. परंतु, प्रत्येकाच्या कामावरील स्तरात फरक असल्याने कर्करोग बळावण्याची कारणे वेगवेगळीही असू शकतात असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुख्यत्वे रुग्णालयांमध्ये परिचारिकांना याची बाधा होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. कारण, परिचारिकांना दीर्घकाळ रात्रपाळी करावी लागत असल्याने स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे परिचारिकांच्या कामाची वेळ बदलत राहणे गरजेचे आहे. सतत रात्रपाळी केल्याने निद्रानाश होतो आणि आधिच कर्करोग झाला असेल तर रात्रपाळीमुळे अधिक बळावतो असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.