नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलची दरवाढ सतत सुरूच असताना स्वयंपाकाच्या गॅसचे दरही पुढील आठवडय़ात वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक गॅस सिलिंडरमागे कमी मिळत असलेली रक्कम (अंडर- रिकव्हरी) १०० रुपयांपेक्षा अधिक झाल्याने ही दरवाढ आवश्यक झाली असून, ती किती होईल हे सरकारच्या परवानगीवर अवलंबून असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवाढीला परवानगी मिळाल्यास, स्वयंपाकासाठी वापरला जाणारा अनुदानित घरगुती गॅस, विनाअनुदानित इंधन आणि उद्योगांसाठी वापरला जाणारे मोठय़ा आकारातील सिलिंडर या सर्व श्रेणींमध्ये होणारी ही पाचवी दरवाढ असेल. यापूर्वी ६ ऑक्टोबरला एलपीजीचे दर सिलिंडरमागे १५ रुपयांनी वाढवण्यात आले होते. यामुळे १४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलिंडरमध्ये जुलैपासून करण्यात आलेली एकूण वाढ ९० रुपये झाली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांना गॅस सिलिंडरच्या किमतीला किरकोळ विक्रीची किंमत संलग्न करण्याची परवानगी देण्यात आलेली नसून, हा फरक भरून काढण्यासाठी कुठल्याही सरकारी अनुदानाला मान्यता मिळालेली नाही, असे या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lpg cylinder price is likely to hike in next week zws
First published on: 28-10-2021 at 00:23 IST