Crime News : बिहारच्या पटणा येथे एका भाड्याने घेतलेल्या घरात एक २७ वर्षीय महिला गुरूवारी (१५ मे) रोजी मृत अवस्थेत आढळून आली. हत्येनंतर पुरवे लपवण्यासाठी या महिलेचा मृतदेह एलपीजी गॅस वापरून जाळण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला. या घटनेतील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच पोलिसांनी महिलेची ओळख पटवली असून हत्येमागील कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलि‍सांकडून तपास केला जात आहे.

एसके पुरी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अनंदपुरी भागात ही घटना घडली. या पीडित २७ वर्षीय महिलेचे नाव संजना सिंह असे असून आणि ती मुजफ्फरपूरची रहिवासी होती. ही महिला स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती इतकेच नाही तर तिला सचिवालयात नोकरी देखील मिळाली होती. पुढील महिन्यात ५ जूनला ती नोकरीवर रूजू होणार होती. गेल्या पाच वर्षांपासून ती एसके पुरी पोलिस स्टेशन हद्दीतील आनंदपुरी परिसरातील एका भाड्याच्या घरात राहत होती.

महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर मुझफ्फरपूर येथून तिच्या कुटुंबियांना बोलवण्यात आले. पीडित महिलेच्या कुटुंबियांनी दावा केला की त्यांच्या मुलीच्या गळ्यावर चाकूचे व्रण आढळून आले आणि त्यांच्या मुलीला जाळण्याच प्रयत्न देखील झाला.

पीडित महिलेचा भाऊ सौरभ सिंह, जो स्वतः ट्रेनी सब- इन्सपेक्टर आहे, त्याने सांगितले की, त्याच्या बहिणीवर आधी चाकूने वार करण्यात आले, त्यानंतर किचनमध्ये ठेवलेला एलपीजी गॅस सिलेंडर खोलीत आणण्यात आला आणि त्याचा पाईप संजनाच्या तोंडात घालून आग लावण्यात आली. तिचा जळालेला मृतदेह तिच्या अंथरुणात आढळून आला.

सौरभने दिलेल्या माहितीनुसार, खोलीत गॅस सिलेंडरचा पाईप मोकळा आढळून आला. याबरोबर पलंग आणि इतर साहित्य देखील जळालेले आढळून आले. पण जवळपासच्या शेजाऱ्यांना याची कसलीच माहिती मिळाली नाही. महिलेच्या अंथरुणावर रक्ताचे डाग देखील आढळले आहेत.

घटनेबद्दल माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा घडला त्या ठिकाणच्या आजूबाजू्च्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. फॉरेन्सिक टीम देखील घटास्थळी दाखल झाली आणि त्यांनी देखील तपास सुरू केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या तरी पोलिस या प्रकरणावर आणि घटनेमागील कारणावर भाष्य करण्यास टाळाटाळ करत आहेत कारण तपास अद्याप सुरू आहे. एफएसएल टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे. त्यांना बेडशीटवर रक्ताचे डाग आढळले आहेत. आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.