एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला आज झटका बसला आहे. १ डिसेंबरपासून गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ केली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १००रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २१०० रुपयांच्या पुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १९ किलोचा सिलेंडर २०५१ रुपयांचा झाला आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये झाला आहे. आता चेन्नईमध्ये १९ किलोच्या सिलेंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ८९९.५० रुपये आहे. सहा ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली होती. तर मुंबईतही घरगुती सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. जानेवारीत मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, ती फेब्रुवारीमध्ये ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला त्याची किंमत ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरची किंमत ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ८१९ रुपये झाली होती. जुलैमध्ये ८३४.५०, तर १८ ऑगस्टला २५ रुपयांनी वाढून ८५९.५० रुपये झाले. यानंतर १ सप्टेंबरला त्यात २५ रुपयांनी वाढ झाली आणि ऑक्टोबरमध्ये १५ रुपयांनी महाग झाला.

दरम्यान, १ डिसेंबरपासून अनेक नियमात बदल होणार आहे. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरची एलपीजी किंमत, होम लोन ऑफर, एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफर, आधार-यूएएन लिंकिंग इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा जुन्या नियमांमध्ये काही बदलांसह काही नवीन नियम लागू होतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lpg price costlier by 100 rs 1 december 2021 commercial cylinder expensive abn
First published on: 01-12-2021 at 08:14 IST