नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांची लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १ मे रोजी ते कार्यभार स्वीकारतील. सध्याचे लष्कराचे उपप्रमुख असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याने राजू यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या बी. एस. राजू हे लष्करी मोहिमांचे महासंचालक आहेत. विजापूर येथील सैनिकी शाळेत आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतलेले लेफ्ट. ज. राजू हे निष्णात हेलिकॉप्टर पायलट आहेत. १५ डिसेंबर १९८४ रोजी त्यांनी जाट रेजिमेंटमधून आपल्या लष्करी कारकीर्दीला सुरुवात केली. आपल्या ३८ वर्षांच्या लष्करी कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक