मोबाईल गेम खेळू न देणाऱ्या आईची १६ वर्षीय मुलाने हत्या केली आहे. यानंतर मुलाने आपल्या १० वर्षीय बहिणीला खोलीत बंद केलं आणि आईच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. तीन दिवस मुलगा आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता. लखनऊनच्या पीजीआय परिसरात ही घटना घडली आहे.

आईचा मृतदेह कुजून त्यातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर मुलाने वडिलांनी फोन केला आणि हत्या झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर चौकशी केली असता अडीच तासातच संपूर्ण उलगडा झाला. मुलगा आपली ४० वर्षीय आई साधना आणि १० वर्षीय बहिणीसोबत राहत होता. मुलाचे वडील लष्कर अधिकारी असून कोलकातामध्ये तैनात आहेत.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
Abhishek suffered a heart attack during a visit to Delhi zoo
हृदयविकाराच्या झटक्याने पतीचा मृत्यू, मृतदेह पाहताच पत्नीने सातव्या मजल्यावरुन उडी मारत संपवलं आयुष्य

रविवारी जेव्हा महिलेने आपल्या १६ वर्षीय मुलाला मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं तेव्हा तो रागावला. यानंतर त्याने वडिलांची परवाना असणारी पिस्तूल घेतली आणि आईच्या डोक्यात गोळी झाडली. महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने पिस्तूल तिथेच बेडवर ठेवलं आणि १० वर्षीय बहिणीला दुसऱ्या खोलीत बंद केलं.

मुलगा तीन दिवस आईच्या मृतदेहासोबत घरातच होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुर्गंध बाहेर जाऊ नये यासाठी तो वारंवार घरात रुम फ्रेशनर मारत होता.

दुर्गंध जास्त पसरु लागल्यानंतर मुलाने मंगळवारी संध्याकाळी वडिलांनी फोन करुन आईच्या हत्येची माहिती दिली. वडिलांनी तात्काळ पोलिसांना फोन करुन सगळा घटनाक्रम सांगितला.

मुलाने पोलिसांना खोटी माहिती देत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला असं पोलिसांनी सांगितलं आहे. इलेक्ट्रिशियन घरी आला होता आणि त्यानेच हत्या केली असं मुलाने पोलिसांना सांगितलं होतं. पण अडीच तासांच्या चौकशीनंतर सर्व सत्य समोर आलं. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.