१०८ वर्षांनंतर अन्नपूर्णा देवीची प्रतिमा कॅनडातून भारतात परत आणली; वाराणसी मंदिरात स्थापना

मातेला चांदीचा मुकुट, सोन्याचा हार आणि बांगडी अर्पण करून, सजवून पूजा केली जाते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सोमवारी येथील काशी विश्वनाथ मंदिरात १०८ वर्षांनंतर कॅनडातून आणलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या पुनर्बांधणीदरम्यान काढण्यात आलेल्या इतर पाच देवतांच्या मूर्तीही स्थापित करण्यात आल्या.
आदित्यनाथ यांच्या खांद्यावर चांदीच्या पालखीतून देवीची मूर्ती मंदिरात नेण्यात आली. सकाळी दुर्गाकुंड येथील कुष्मांडा मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात स्तोत्रांच्या गजरात या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

प्रत्येक जिल्ह्यात माता अन्नपूर्णा यांच्या प्रतिमेचे भव्य स्वागत करण्यात आले. आज सकाळी वाराणसीतील दुर्गाकुंड मंदिरातून मातेच्या मूर्तीची मिरवणूक निघाली आणि गुरुधाम चौक, विजया मॉल, ब्रॉडवे हॉटेल, मदनपुरा, गोदौलिया मार्गे श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या गेट क्रमांक चारवर पोहोचली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मातेची आरती करून तिचे स्वागत केले.

108 वर्षांनंतर महादेवाच्या नगरीतील काशीतील अन्नपूर्णा मातेच्या या प्राचीन मूर्तीचे चेतमणी गुरुधाम चौकात अग्रवाल महासभा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल यांनी पुष्पवृष्टी व आरती करून स्वागत केले. मातेला चांदीचा मुकुट, सोन्याचा हार आणि बांगडी अर्पण करून, सजवून पूजा केली जाते.

रविवारी रात्री मुख्यमंत्री दोन दिवसांच्या दौऱ्यावर येथे आले होते. त्यांनी रात्री उशिरा लहुराबीर-मैदगीन रस्त्यावरील शाही नाल्याच्या सफाई व दुरुस्तीची पाहणी करून काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maa annapurna idol rath yatra reached kashi vishwanath dham cm yogi adityanath welcome in varanasi vsk

ताज्या बातम्या