Hindenburg Research : गेल्या वर्षी अदाणी समूहावर हिंडेनबर्ग रिसर्चने गंभीर आरोप केले होते. हिंडेनबर्गने अहवालाद्वारे केलेल्या आरोपांचा परिणाम अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर झाला होता. यानंतर आता हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा भारतात काहीतरी घडणार असल्याचा दावा केला. एवढंच नाही तर सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, आरोपानंतर आता माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी स्पष्टीकरण देत एक निवेदन प्रसिद्ध केलं. तसेच हिंडेनबर्गने केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “हिंडनबर्ग अहवालात नमूद केलेल्या निधीतील गुंतवणूक २०१५ मध्ये करण्यात आली होती, तेव्हा ते दोघेही सिंगापूरमधील खासगी नागरिक होते. तसेच सेबीमध्ये रुजू होण्यापूर्वी २ वर्षे आधीच गुंतवणूक केली गेली होती, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच या निवेदनात त्यांनी हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : Hindenburg : “…म्हणून सेबीने अदाणींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई केली नाही”, हिंडेनबर्गचा आणखी एक धमाका

निवेदनात काय म्हटलं?

हिंडनबर्ग अहवालात नमूद केलेल्या फंडातील गुंतवणूक २०१५ मध्ये करण्यात आली होती. जेव्हा ते सिंगापूरमध्ये वैयक्तिक राहणारे नागरिक होते. तसेच माधबी सेबीमध्ये सहभागी होण्याआधीच ही गुंतवणुकीचा निर्णय मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिल आहुजा यांच्या प्रभावाखाली घेतला गेला होता. माधबीने सेबीमध्ये सामील होण्याच्या जवळपास २ वर्षे आधीच घेतला गेला, असं म्हटलं आहे. २०१८ मध्ये अनिल आहुजा यांनी सीआयओ पद सोडले, तेव्हा आम्ही त्या फंडातील गुंतवणूकीची पूर्तता केली. निवेदनात असंही म्हटलं की, सेबीने दोन वर्षात ३०० पेक्षा जास्त सर्क्युलर जारी केले आहेत.

हिंडेनबर्ग अहवालात नेमकं काय म्हटलं?

हिंडनबर्गने असे म्हटले की, ‘‘आपण आपले कामकाज सुरू ठेवल्यास, त्यामध्ये कोणताही गंभीर हस्तक्षेप होण्याची जोखीम नाही याचा अदाणींना वाटणारा संपूर्ण आत्मविश्वास आमच्या आधी लक्षात आला होता. त्यामुळे अदाणींचे माधवी बुच यांच्याशी असलेल्या संबंधांमधून त्याचा खुलासा मिळेल असे सूचित होत होते. तेव्हा आम्हाला माहित नव्हते की, माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचे त्याच बर्म्युडा आणि मॉरिशस फंडांमध्ये छुपे हिस्सेदारी होती, ज्यांचा वापर विनोद अदाणींनी (आर्थिक गैरव्यवहारांसाठी) केला होता. आम्ही अदाणींच्या भांडवली बाजारातील घोटाळ्याबद्दल १८ महिन्यांपूर्वी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याचा तपास करण्यात ‘सेबी’ने आश्चर्यकारकरित्या उत्साहाचा अभाव दाखवला होता’’ असे हिंडनबर्गने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhabi puri buch and her husband dhaval said buch on hindenburg research and adani group marathi news gkt
Show comments