ग्वाल्हेरमध्ये एका शासकीय कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर मंचावरून खाली कोसळल्याची घटना घडली. त्यांना मुका मार देखील लागला आहे. तोमर या ठिकाणी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. दरम्यान, ते मंचावरून खाली पडले.

ग्वाल्हेर येथे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी केंद्रीयमंत्री नरेंद्र सिंह तोमर, राज्याचे मंत्री भारत सिंह कुशवाह, खासदार विवेक शेजवलकर, वरिष्ठ नेते प्रभात झा यांची मंचावर उपस्थिती होती. हा मंच जवळपास १० फूट रूंद होता. ज्यावर जवळपास २५ जण बसलेले होते. याचवेळी मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांचा तोल गेल्याने ते अचानक खाली पडले व त्यांना मुका मार लागला.

Bhandara, Nana Patole car accident
नाना पटोलेंच्या कारला अपघात; उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत
Paper leak Examination Malpractices Act Report submitted by Nimbalkar Committee
पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा! निंबाळकर समितीकडून अहवाल सादर
rahul shewale
चावडी: एक दिवसाचा ‘महापौर’

प्रद्युम्न तोमर मंचावरून खाली पडताच कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. उपस्थिते नेते व कार्यकर्ते त्यांना उचलण्यासाठी त्यांच्याकडे तत्काळ धावले होते.

विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात –

प्रद्युम्न सिंह तोमर कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ते आपल्या स्वच्छता अभियासाठी ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वीच भोपाळमध्ये वीज विभागाच्या कार्यालयाबाहेर ट्रान्सफार्मरजवळ उगवलेले गवत पाहून त्यांनी ते स्वतः काढले होते. शासकीय कार्यालयातील अस्वच्छता पाहून तिथे देखील ते स्वच्छता करत असतात. विना हेलमेट वाहन चालवल्याने स्वतः पोलीस स्टेशन गाठून पावती फाडली होती आणि मुलाने चूक केल्यानंतर पोलिसांसमोर त्याला माफी मागायला लावली होती.