मध्य प्रदेशातील मंत्री रामखेलावन पटेल यांची अन्न विभागाच्या एका अधिकाऱ्याला धमकी देतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. “अमरपाटन मतदारसंघातील कोणत्याही दुकानदारावर गुन्हा दाखल करायचा नाही, असे केल्यास फासावर उलटं लटकवेन”, अशी अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप पटेल यांच्यावर करण्यात येत आहे. पटेल यांच्या मतदारसंघात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात एका अधिकाऱ्याला फोनवर धमकावतानाची पटेल यांची ऑडिओ क्लिप वेगाने व्हायरल होत आहे.

माणुसकी दाखवणारी घटना! रुग्णालयात असहाय्य स्थितीत पडलेल्या मुलाला पाहून IAS अधिकाऱ्याला अश्रू अनावर, पाहा VIDEO

मतदारसंघातील काही ठिकाणांवर कारवाई करायची नाही, असे हिंदीत या ओडिओ क्लिपमध्ये पटेल अधिकाऱ्याला सांगत आहेत. पटेल यांनी धमकावलेल्या अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून नियम भंग करण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. चौहान यांनी काही अधिकाऱ्यांना निलंबितदेखील केले आहे.

“भारतातील ‘या’ राज्यांमध्ये प्रवास करू नका”, कॅनडाचा आपल्या नागरिकांना अजब सल्ला; सुरक्षेचं दिलं कारण!

रामखेलावन पटेल हे मागासवर्गीय कल्याण खात्याचे राज्यमंत्री आहे. याआधीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत सत्ताधारी भाजपाला अडचणीत आणले आहे. तुरुंगात बंदिस्त सहकाऱ्याच्या मुक्ततेसाठी रक्ताचे पाट वाहतील, या त्यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सतना जिल्ह्यातील रामनगरमध्ये एका बैठकीदरम्यान पटेल यांचे सहकारी राम सुशील पटेल यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केली होती. याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी रामखेलावन पटेल यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर आता अधिकाऱ्याला धमकावतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.