न्यूझीलंडमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल असल्याचं नोंदवण्यात आलं आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू न्यूझीलंडच्या केरमाडेक बेट येथे १० किलोमीटवर खोलीवर आहे. दरम्यान, भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.
गुरुवारी ( १६ मार्च ) सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हे धक्के ७.१ रिश्टर स्केलचं असल्याचं अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेत नोंदवण्यात आलं. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या ३०० किलोमीटरच्या परिसरातील सर्व बेटांना त्सुनामीचा इशारा दिला आहे.
हेही वाचा : ७०० भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाहून ‘घर’वापसी; बनावट व्हिसाप्रकरणी होणार कारवाई
न्यूझीलंडमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असतात. कारण, ते पॅसिफिक प्लेट आणि ऑस्ट्रेलियन प्लेटच्या सीमेवर वसलेलं आहे. तसेच, हे ‘रिंग ऑफर फायर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीव्र भूकंपीय प्रदेशाच्या काठावर आहे. दरवर्षी न्यूझीलंड हजारो भूकंपाच्या धक्क्याने हादरलं जातं.
हेही वाचा : केरळ विधानसभा आवारात मार्शल-आमदारांत हाणामारी, विधानसभा अध्यक्षांविरोधात आमदारांचा संताप
दरम्यान, ६ फेब्रुवारीला टर्की आणि सीरिया भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली होती. हा भूकंप ७.८ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपात ५० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक घरं आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भारताने दोन्ही देशांना मदतीसाठी एनडीआरफ आणि जवानांची तुकडी पाठवली होती.