इटलीमध्ये महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर काही वेळातच खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. तसेच पुतळ्याच्या भिंतीवर खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्याबद्दल वादग्रस्त मजकूरही लिहिण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ सदर परिसर स्वच्छ करून घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

इटलीमध्ये उद्या जी७ देशांची बैठक होणार असून या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. जी७ देशांची ५० वी परिषद इटलीच्या अपुलीया प्रांतातील बोर्गो एग्नाझिया या आलिशान रिसॉर्टमध्ये होत आहे. १३ ते १५ जून असे दोन दिवस ही परिषद चालणार आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी या परिषदेची माहिती देताना सांगितले की, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अपुलीयाला रवाना होणार आहेत.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
naseeruddin shah interview
“मुस्लिमांना शिक्षणापेक्षा सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची जास्त चिंता”, अभिनेते नसिरूद्दीन शाह यांचं विधान; म्हणाले, “हिंदू-मुस्लीम एकोपा दिसल्याची ‘ती’शेवटची वेळ!”
Jayesh Pujari karnataka
नितीन गडकरींना धमकी, आता ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; आरोपी पुजारीला न्यायालयातच मारहाण
amit shah get angry with tamilisai soundararajan
अमित शाह भरसभेत माजी राज्यपालांवर भडकले? नेमकं काय झालं? पाहा VIDEO
Manoj jarange patil
“हे माझं शेवटचं उपोषण, आता थेट…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा! दिल्लीत रचणाऱ्या षडयंत्राविषयी म्हणाले…
sharad pawar
शरद पवार शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, “मी गेल्या एक वर्षापासून…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल

इटलीत महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याच्या विंटबनेची माहिती देताना क्वात्रा म्हणाले की, भारतीय यंत्रणेने या घटनेची माहिती इटलीच्या यंत्रणेला दिली आहे. तसेच योग्य ती कारवाई करण्यासही सांगितले आहे. जे कुणी दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. बुधवारी माध्यमांशी संवाद साधत असताना क्वात्रा यांनी ही माहिती दिली.

मागच्या वर्षी कॅनडाच्या विद्यापीठातील परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली होती. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील विद्यापीठात खलिस्तानी कट्टरपंथीयांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली होती.