Queen Elizabeth Death : ब्रिटनचे महाराणी पद सर्वाधिक काळ भुषवणाऱ्या एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. प्रकृतीच्या तक्रारीनंतर वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, ब्रिटनच्या महाराणी असताना राणी एलिझाबेथ द्वितीय यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अनेक भेटवस्तू मिळाल्या. मात्र, त्यातली एक भेटवस्तू अतिशय मौल्यवान होती. ही भेटवस्तू म्हणजे त्यांना मिळालेला हात रुमाल. तो रुमाल भेट देणारे व्यक्ती दुसरं-तिसरं कोणी नसून खुद्द महात्मा गांधी होते.

नोव्हेंबर १९४७ मध्ये राणी एलिझाबेथ यांचा फिलीप माऊंटबॅटन यांच्याशी विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याला गांधीही उपस्थित होते. यावेळी गांधीजींनी राणी एलिझाबेथ यांना रुमाल भेटवस्तू म्हणून दिला होता. तो रुमाल त्यांनी आयुष्यभर सांभाळला. पंतप्रधान मोदी यांच्या ब्रिटनदौऱ्यावेळी राणी एलिझाबेथ यांनी तो रुमाल पंतप्रधान मोदींनाही दाखवला होता.

आणखी वाचा – गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

दरम्यान, राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनीही दुखं व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले. ”२०१५ आणि २०१८ मध्ये माझ्या यूके (लंडन) भेटीदरम्यान राणी एलिझाबेथ यांच्याशी झालेली भेट स्मरणीय होती. मी त्यांचा प्रेमळ स्वभाव कधीही विसरू शकत नाही. यावेळी त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट दिलेला रुमालही दाखवला होता.”