Mahatma Gandhi looklike demon in hindu mahasabh pandal at kolkata, congress cpi-m,trinamool criticized BJP | Loksatta

महात्मा गांधींना दाखवलं राक्षसाच्या रुपात; हिंदू महासभेच्या देखाव्यावरुन नवा वाद, आयोजक म्हणतात…

दुर्गा पूजेतील या देखाव्यावर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमुल काँग्रेस, भाजपा, सीपीआय-एम, काँग्रेससह सर्व पक्षांनी टीका केली आहे.

महात्मा गांधींना दाखवलं राक्षसाच्या रुपात; हिंदू महासभेच्या देखाव्यावरुन नवा वाद, आयोजक म्हणतात…
दुर्गा पूजेत महात्मा गांधींसारखा दिसणारा एक पुतळा देखाव्यात ठेवण्यात आला आहे

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कोलकात्यातील दुर्गा पूजेत महात्मा गांधींसारखा दिसणारा एक पुतळा देखाव्यात ठेवण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या दुर्गा पूजेत राक्षस म्हणून धोतर नेसलेला हातात काठी असलेला हा पुतळा हुबेहुब महात्मा गांधींसारखा घडवण्यात आला आहे. या पुतळ्याचे आणि महात्मा गांधींमधील साम्य योगायोग असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधींच्या भूमिकेवर टीका करणे आवश्यक असल्याचेही आयोजकांनी म्हटले आहे.

दुर्गापूजा मंडपात आरती सुरू असताना भीषण आग; तिघांचा मृत्यू, ५२ जणांवर उपचार सुरू

दुर्गा पूजेतील या देखाव्यावर राज्यातील सत्ताधारी तृणमुल काँग्रेस, भाजपा, सीपीआय-एम, काँग्रेससह सर्व पक्षांनी टीका केली आहे. “टक्कल पडलेली आणि चष्मा घातलेली व्यक्ती गांधींच असण्याची गरज नाही. या देखाव्यातील राक्षसाजवळ ढाल आहे. गांधींकडे ढाल कधीच नव्हती. आमच्या देखाव्यात दुर्गा देवीने वध केलेला राक्षस गांधींसारखा दिसणे योगायोग आहे”, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय हिंदू महासभेच्या पश्चिम बंगालचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रचूर गोस्वामी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिले.

Dussehra 2022: सोन्याची लक्ष्मी सजली, ६ कोटी रुपयांच्या नोटांची आरास, १३५ वर्ष जुन्या श्रीमंत देवीचे रूप पाहा

असभ्यतेची उंची गाठल्याचे म्हणत तृणमूल कांग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल घोष यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “हा भाजपाचा खरा चेहरा आहे. भाजपा बाकी जे करते ते नाटक आहे. महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. जगाकडून गांधी आणि त्यांच्या विचारधारेचा आदर केला जातो. गांधींचा अशाप्रकारे अपमान सहन केला जाऊ शकत नाही. याचा आम्ही जाहीर निषेध करतो”, असे घोष यांनी म्हटले आहे.

Navratri 2022: आदिशक्तीच्या जागरात ‘ती’ला प्रवेश नाही; नवरात्रीत ‘या’ मंदिरात महिलांना मनाई का घातली जाते?

भाजपा आणि संघाला केवळ भारताचे विभाजन कसे करायचे हेच कळते. ब्रिटिशविरोधी शक्तींना ते ‘असुर’ मानतात आणि दुर्गा मातेला ब्रिटिश, अशी टीका सीपीआय-एमच्या केंद्रीय समितीचे सदस्य समिक लहिरी यांनी केली आहे. रविंद्रनाथ टागोर यांनी गांधींना महात्मा असे संबोधले होते. अशा महान व्यक्तीचा अपमान केवळ भारतासाठीच नव्हे तर देशासाठी शरमेची बाब आहे, असे काँग्रेस प्रवक्ते सौम्या रॉय यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोलकात्यातील या वादग्रस्त देखाव्यावर भाजपाचे प्रवक्ते समीक भट्टाचार्य यांनी पक्षाची बाजू स्पष्ट केली आहे. “अशा गोष्टींना आम्ही पाठिंबा देत नाही, हे संपूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. प्रशासनाने आयोजकांवर याबाबत तात्काळ कारवाई करावी”, अशी मागणी भट्टाचार्य यांनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Congress Presidential Election: मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाले तरी, यांच्यासारखे नेते…, शशी थरुर यांचं मोठं विधान

संबंधित बातम्या

“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान; अमरिंदर सिंग, सुनील जाखड राष्ट्रीय कार्यकारिणीत, शेरगील प्रवक्ते
‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू

व्हिडिओ

ताज्या बातम्या
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण
जत तालुक्याला पाणी योजनांसाठी निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सरकारतर्फे वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल ; पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
वेदमंत्रांच्या घोषात मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे! ; हंसराज अहिर यांच्याकडे पदभार