राज्यसभेच्या दुसऱया जागेसाठी राष्ट्रवादीकडून माजिद मेमन

राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यसभेतील दुसऱय़ा जागेसाठी प्रसिद्ध वकील माजिद मेमन यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यसभेतील दुसऱय़ा जागेसाठी प्रसिद्ध वकील माजिद मेमन यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. पक्षाचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या दोन जागांपैकी एकावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढविणार असल्याचे आधीच निश्चित होते. स्वतः पवार यांनीही आपण आता लोकसभेची निवडणूक लढविणार नसून, राज्यसभेवर जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. राज्यसभेच्या दुसऱया जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळते, याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. माजिद मेमन यांनाच संधी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. येत्या २४ जानेवारीला शरद पवार आणि माजिद मेमन मुंबईमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Majid memon will be rajya sabha candidate for nationalist congress