scorecardresearch

Turkey Earthquake Video : तीन भूकंपांमुळे टर्कीमध्ये मोठी जीवितहानी, आतापर्यंत २५०० जणांचा मृत्यू

Turkey Earthquake : मध्य टर्की तसेच उत्तर-पश्चिम सिरियामध्ये झालेल्या तीन भूकंपांमुळे मोठी जीवितहानी झाली आहे.

turkey earthquake
(फोटो सौजन्य-ट्विटर, @omarsuleiman504)

Turkey Earthquake Update : मध्य टर्की तसेच उत्तर-पश्चिम सिरियामध्ये झालेल्या तीन भूकंपांमुळे येथे मोठी जीवितहानी झाली आहे. भूकंपामध्ये आतापर्यंत २५०० जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अद्याप शेकडो लोक ढासळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. याच कारणामुळे मृतांसह जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मृतांचा आकडा आता २५०० वर

टर्कीमधील आपत्कालीन विभागाने या भूकंपांमध्ये झालेल्या जीवितहानीबाबत अधिक माहिती दिली आहे. या माहितीनुसार टर्कीमध्ये झालेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे आतापर्यंत १४९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सिरियामध्ये आतापर्यंत ८१० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आता २५०० वर पोहोचला आहे.

हेही वाचा >> Turkey Earthquake : भारत सरकार करणार टर्की देशाची मदत, भूकंपग्रस्त भागात पाठवणार रेस्क्यू टीम

इतिहासातील सर्वांत मोठा आणि भीषण भूकंप

सिरियामध्ये सोमवारी (६ फेब्रुवारी) पहाटे ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर काही तासांच्या अंतरांवर आणखी दोन मोठे भूकंपाचे धक्के बसले. या एकूण तीन भूकंपांमुळे टर्की देशातील महत्त्वाचे प्रदेश भुईसपाट झाले आहेत. टर्कीमधील राष्ट्रीय भूकंप केंद्राचे प्रमुख रायद अहमद यांनी या दुर्घटनेला इतिहासातील सर्वांत मोठा आणि भीषण भूकंप असल्याचे म्हटले आहे.

भूकंपाच्या घटना रात्री घडत आहेत, त्यामुळे बचावकार्य करणे कठीण

भूकंपाच्या या घटनेवर टर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यीप एर्दोगान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बचावकार्यासाठी प्रत्येकजण पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जात आहेत. मात्र सध्या हिवाळा आहे. बाहेर खूप थंडी आहे. त्यात भूकंपाच्या घटना रात्री घडत आहे. त्यामुळे वचावकार्य कठीण झाले आहे,” असे एर्दोगान म्हणाले आहेत.

हेही वाचा >>Turkey Earthquake Video : टर्कीमध्ये २४ तासांत तिसरा भूकंप, मृतांचा आकडा १५०० च्या वर

भारत टर्कीच्या मदतीला धावला

दरम्यान, भूकंपाच्या घटनेमुळे टर्कीमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. टर्की सरकारकडून अन्य देशांनी आम्हाला संकटकाळात मदत करावी, असे आवाहन केले आहे. अशा कठीण काळात भारत टर्कीच्या मदतीला धावला आहे. भारताकडून तेथे बचावपथकाच्या दोन टीम पाठवण्यात आल्या आहेत. सोबतच वैद्यकीय मदतही पाठवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 22:59 IST