आपल्या राजवटीत एका न्यायाधीशाला अटक करून डांबून ठेवल्याप्रकरणी मालदिवचे माजी अध्यक्ष महम्मद नाशीद यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली असून बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याआधी दोन पकड वॉरन्ट त्यांच्यावर बजाविण्यात आली होती. पण ती टाळण्यासाठी त्यांनी गेले ११ दिवस भारतीय दूतावासात आश्रय घेतला होता. मंगळवारी ते दूतावासातून बाहेर पडताच त्यांना अटक झाली.
आपली अटक हा राजकीय कट असल्याचा आरोप नाशीद यांनी केला आहे. त्यांच्या अटकेनंतर मालदिवमध्ये  हिंसाचार उसळला आहे.