Premium

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी मोहम्मद मुईझ यांची निवड 

सध्याचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना ४६ टक्के मते मिळाली असून, मुईझ हे १८ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले असल्याचे वृत्त ‘मिहारू न्यूज’ने दिले

Maldives opposition candidate Muizzu wins presidential vote
मोहम्मद मुईझ photo : ap

एपी, माले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधी पक्षांचे उमेदवार मोहम्मद मुईझ हे मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. त्यांना ५३ टक्क्यांहून अधिक मते मिळाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. ही निवडणूक म्हणजे एकप्रकारे हिंद महासागरातील या द्वीपकल्प राष्ट्रावर कोणत्या प्रादेशिक सत्तेचे वर्चस्व राहील- भारत की चीन- या मुद्दय़ावरील सार्वमत ठरली होती.

हेही वाचा >>> भारत-अमेरिका संबंध चंद्रयानाप्रमाणे सर्वोच्च स्तरावरच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा विश्वास

सध्याचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना ४६ टक्के मते मिळाली असून, मुईझ हे १८ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले असल्याचे वृत्त ‘मिहारू न्यूज’ने दिले. ‘आजच्या निकालाने आम्हाला देशाचे भवितव्य निर्माण करण्याची संधी आणि मालदीवचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याची ताकद मिळाली आहे. आम्ही आमचे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची वेळ आली आहे’, असे मुईझ यांनी विजयानंतर केलेल्या वक्तव्यात सांगितले. सोलिह यांनी माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना तुरुंगातून बाहेर काढून नजरकैदेत ठेवावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

हेही वाचा >>> अमेरिकेतील पेच टळला; सरकारी खर्चाला मंजुरी 

२०१८ साली निवडून आलेले सोलिह यांनी भारताला देशात अर्निबध वावर करण्याची मोकळीक दिल्याचा आरोप मुईझ यांनी केला होता. मुईझ यांचा पीपल्स नॅशनल काँग्रेस हा पक्ष पूर्णपणे चीनधार्जिणा मानला जातो. मालदीवमध्ये भारतीय लष्कराची उपस्थिती ही केवळ दोन सरकारांमधील करारानुसार जहाजबांधणीची गोदी बांधण्याकरिता होती आणि आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचा भंग होणार नाही असे सोलिह यांनी वारंवार सांगितले होते. याउलट, आपण ही निवडणूक जिंकल्यास  भारतीय फौजांना मालदीवमधून हटवू आणि मोठय़ा प्रमाणात भारताला अनुकूल असलेल्या देशाच्या व्यापार संबंधांचे संतुलन साधू, असे आश्वासन मुईझ यांनी दिले होते.

मोदींकडून अभिनंदन

मालदीवच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद मुईझ यांचे अभिनंदन केले आहे. काळाच्या कसोटीवर उतरलेले भारत-मालदीव द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यास आणि हिंदू महासागर क्षेत्रात आपले एकूण सहकार्य वाढवण्यास भारत वचनबद्ध आहे, असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maldives opposition candidate mohamed muizzu elected as new president zws

First published on: 02-10-2023 at 00:16 IST
Next Story
भारत-अमेरिका संबंध चंद्रयानाप्रमाणे सर्वोच्च स्तरावरच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा विश्वास