नवी दिल्ली : संघ-भाजपविरोधात ताकदीने आणि प्रभावीपणे संघर्ष कोण करू शकेल, या मुद्दय़ावरून काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवली जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दोन्ही उमेदवार मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यामध्ये संघ-भाजपविरोधात लढण्यावरून सहमती झाली असली तरी, त्यासाठी सक्षम कोण, हा वादाचा मुद्दा ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गांधी कुटुंबाचे ‘अधिकृत’ मानले जात असलेले उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना सहमतीने पक्षाध्यक्ष ठरवण्याचे व संघ-भाजपविरोधात एकत्रित लढण्याचे आवाहन केले होते. पण, थरूर यांनी खरगेंची विनंती फेटाळली.  थरूर यांनी प्रत्युत्तर दिले की, काँग्रेसमधील आपण सगळेच संघ-भाजपविरोधात लढत आहोत पण, हे काम कसे केले पाहिजे आणि ते प्रभावीपणे कोण करू शकेल, या पक्षाध्यक्ष निवडणुकीतील कळीचा मुद्दा आहे. १७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून मतदारांनी याच कळीच्या मुद्दय़ावर मतदान केले पाहिजे, असे थरूर यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge and shashi tharoor agree to fight against sangh bjp zws
First published on: 04-10-2022 at 08:00 IST